*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कृषी विभागाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी तत्काळ करावी यासाठी दोन ऑक्टोबर रोजी उपोषण करण्याचा इशारा गुळसडी येथील महिला शेतकरी रत्नमाला सुनील गायकवाड यांनी दिला आहे .
त्यांनी यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण केले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी व संबंधितांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत त्यांनी केली नसल्याने त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे .याबाबत निवेदन त्यांनी सर्व वरिष्ठांना दिलेले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,
जैन केळी रोपांबाबतच्या तक्रारीवर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, पंचायत समितीचे गुण नियंत्रण अधिकारी संभाजी पवार या दोघांनी लेखी आश्वासन दिले होते.
लेखी आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही.जैन केळी रोपांच्या बाबतीत स्थानिक विक्रेते करमाळा मशनरी चे अजित मसलेकर यांच्याकडून जैन कंपनीचे केळी रोपे खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार रत्नमाला गायकवाड यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी केली होती .
या संदर्भात दि. १८ मार्च २०२६, २७ मे २०२६ आणि ८ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारीकडे तक्रारी केल्या मात्र, तक्रारीवर कार्यवाही होत नसल्याने सौ. गायकवाड यांनी दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते .
यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार, तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल पाच दिवसांच्या आत सादर करणे ,संबंधित प्रकरणाची विशेष चौकशी तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत पंधरा दिवसांच्या आत करणे , डीलरची विशेष चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करणे, तक्रार निवारण समितीच्या अहवालाच्या आधारे संबंधित शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई ग्राहक न्यायालयामार्फत मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे असे लेखी आश्वासन दिले होते.
त्यामुळे दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पर्यंत पूर्तता न झाल्याने २ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासहित आमरण उपोषण करण्याचा इशारा रत्नमाला गायकवाड यांनी दिला आहे.
चौकट
तक्रार निवारण समितीच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी. तक्रार निवारण समितीच्या सचिवांनी त्यांना तालुका अध्यक्षांच्या दालनात बोलावून दबाव आणून कोऱ्या अहवालावर स्वाक्षरी घेतली. या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
.. रत्नमाला गायकवाड, पिडित महिला शेतकरी,रा. गुळसडी
**
फोटो
रत्नमाला गायकवाड
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*कृषी विभागाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी अन्यथा महिला शेतकरी २ ऑक्टोबर रोजी करणार उपोषण--रत्नमाला गायकवाड*
*कृषी विभागाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी अन्यथा महिला शेतकरी २ ऑक्टोबर रोजी करणार उपोषण--रत्नमाला गायकवाड*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा