Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

अकलूजच्या शिरपेचात मानाचा तुरा लंडन येथील प्रतिष्ठित परिषदेत अकलूजच्या डॉ. निखिल गांधी यांना ‘सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पुरस्कार’ ने सन्मानित;*

*अकलूज-- प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.निखिल एम. गांधी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकलूजचे नाव उज्ज्वल केले आहे.लंडन येथे आयोजित जगातील सर्वात प्रतिष्ठित नेत्ररोग परिषदांपैकी एक असलेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्स - २०२६ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुपम नेत्र रुग्णालय व लेझर केंद्र,अकलूजचे संचालक असलेले डॉ.निखिल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून मोतीबिंदू व नेत्र शस्त्रक्रिया क्षेत्रात कार्यरत आहेत. यंदा लंडन येथे झालेल्या या परिषदेत जगभरातील हजारो नेत्ररोगतज्ज्ञ,नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ,संशोधक सहभागी झाले होते.या परिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञान,नवीन संशोधन आणि क्लिष्ट शस्त्रक्रियांवरील सादरीकरणे सादर केली जातात. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर डॉ. गांधी यांनी सादर केलेल्या शस्त्रक्रियाविषयक चलचित्राला परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले.त्यांच्या चलचित्रातील तांत्रिक कौशल्य,नाविन्यपूर्ण पद्धत आणि रुग्णहिताचा दृष्टिकोन याची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पुरस्कार जाहीर करण्यात आला. डॉ.निखिल गांधी हे केवळ रुग्णसेवेतच नव्हे तर वैद्यकीय संशोधन,शैक्षणिक कार्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. ग्रामीण भागात असूनही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते अकलूज परिसरातील हजारो रुग्णांना दृष्टीदानाचे कार्य करत आहेत.अकलूजसारख्या ग्रामीण भागातून कार्यरत राहून लंडन सारख्या जागतिक व्यासपीठावर पुरस्कार मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.या पुरस्कारामुळे अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नोंद झाली असून, परिसरातील वैद्यकीय,सामाजिक व सर्व स्तरातून डॉ.निखिल गांधी यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा