Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर करमाळा शहर तसेच तालुक्यात वरूणराजाचे जोरदार आगमन; शेतकऱ्यांना दिलासा*

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
संपूर्ण करमाळा तालुक्यात ऐन पावसाळ्यात पावसाने दीर्घ ब्रेक घेतल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. तब्बल दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर गणेशोत्सव काळात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता करमाळा शहर तसेच परिसरातील मांगी, आळजापूर ,पोथरे ,खडकी, उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव, पुनवर, कामोने रावगाव, पांडे, हिसरे,फिसरे, गौंडरे, निमगाव, आवाटी, देवळाली आधी ग्रामीण भागात रात्री आठ ते सव्वा आठ च्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे करमाळा शहर तसेच तालुक्यातील परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात कमालीचे आनंदाचे वातावरण पसरले आहे या जोरदार पावसामुळे मात्र करपलेल्या पिकांना एक प्रकारे जीवदान मिळणार आहे. मोठ्या कालखंडानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहे
गेल्या काही दिवसांपासून करमाळा शहर तसेच परिसरात उन्हाचा चटका कमालीचा वाढला होता. दररोज सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. पाऊस येणार असे वाटत असतानाच आभाळ पुन्हा निरभ्र होत होते आणि पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे 'कधी एकदा पाऊस पडतो' अशी भावना सर्वत्र व्यक्त होत होती. दरम्यान, हवामान विभागाने परतीचा पाऊस चांगला बरसेल असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वीच अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असा अंदाज हवामान विभागाने दिला होता, तोच अंदाज सध्या खरा ठरताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा