Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

*काश्मीर नाही जमलं म्हणून अकलूजमध्येच वैष्णोदेवी अवतरली !* भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी...! अकलूज येथील नागराज गणेशोत्सव मंडळाने साकारला देखावा.

*अकलूज-- प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा अनेक भक्तांच्या मनात असते; मात्र अंतर,वेळ आणि खर्चामुळे प्रत्येकालाच काश्मीरला जाणं शक्य होत नाही.अशाच भाविकांसाठी अकलूजमध्येच साकारण्यात आलं आहे माता वैष्णवी देवीच्या मंदिराचं हुबेहूब दर्शन देणारं देखावं ! अकलूज येथील नागराज गणेश उत्सव मंडळ,जुना बाजार तळ यांच्या वतीने हा देखणा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यात माता वैष्णवी देवीच्या मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली असून देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिरात प्रवेश करताच काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराची अनुभूती मिळत असल्याने भक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.काश्मीरला जाता आलं नाही तरी अकलूजमध्येच वैष्णवी मातेचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळत असल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा