Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल तर्फे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला 'सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड २०२६' प्रदान करून गौरव.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील प्रथम क्रमांकाचे मानाचे स्थान पटकावणाऱ्या 'रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल'च्या वतीने यंदाचा प्रतिष्ठित 'सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड २०२६' ( एसईआर ए २०२६ ) शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सबलीकरण आणि मोबाईल व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक क्षेत्रांत ट्रस्टने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता 'अल्फा बाईट हॉल, इंदापूर' येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रो. योगेश भिडे ( व्होकेशनल डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट ३१३१) उपस्थित होते. यावेळी रो. सविता भोर, रो. वसंतराव मालुंजकर ( इकोनोमी अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट डायरेक्टर), संस्थापक अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सन्माननीय पाहुणे म्हणून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर, वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुभाषचंद्र कराळे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या अध्यक्षा रो. मंदाकिनी डोंबाळे आणि संचालक मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या मुलांसाठी 'शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र' थेट शेतात जाऊन मोफत आरोग्य तपासणी व उपचारांची सोय उपलब्ध करून देते. या उपक्रमाचा आतापर्यंत ४५,००० हून अधिक मजुरांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. महिला सबलीकरणासाठी विशेष उपक्रम राबवून गारमेंट मेकिंग व इतर क्षेत्रांत स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात, ज्यातून १५०० पेक्षा जास्त महिल आत्मनिर्भर झाल्या असून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे. याशिवाय, वंचित घटकांसाठी 'तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन', 'ओजस बालसंस्कार वर्ग', जनजागृती पथनाट्य, पालकत्व शिबिरे, 'अ‍ॅनिमिया मुक्त शाळा अभियान', मोबाईल व्यसनमुक्ती कार्यशाळा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या एआय व रोबोटिक्स कार्यशाळा आणि क्रीडारंग स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त सामाजिक व समाजसेवी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे तुषार रंजनकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील प्रथम क्रमांकाच्या क्लबकडून मिळालेला हा बहुमान संस्थेच्या सामाजिक कार्याला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी अरविंद गारटकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाच्या प्रभावामुळे हा पुरस्कार संस्थेस दिल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सागर कांबळे यांनी केले. या प्रसंगी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या संचालक सौ. नायकुडे मॅडम, ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, कार्यकर्ते महादेव चव्हाण, भारत बोराटे, हमीद आत्तार तसेच संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, अमोल राऊत, केदार गोसावी, स्वाती कोल्हे व वैष्णवी झगडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा