Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

नीरा भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, संस्थापक हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळास नवी दिल्ली येथे प्रदान.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांचा गाळप हंगाम सन २०२५-२६ साठीचा राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित समारंभामध्ये मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत हा पुरस्कार अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे व संचालक मंडळांने स्वीकारला.
राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा २०२४-२५ व २०२५-२६ चे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभामध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांच्या हस्ते निरा भीमा कारखान्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट तांत्रिक कामगिरी केल्याने राष्ट्रीय कार्यक्षमतेचा पुरस्कार देऊन हा गौरव करण्यात आला. कारखान्यास सन २०२५-२६ च्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्येच देशपातळी वरील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे गौरोदगार अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी काढले.
या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराबद्दल हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतकांचे अभिनंदन केले. कारखान्यास आजपर्यंत या पुरस्कारासह राज्य व देशपातळीवरील एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहिती देखील अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली. या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी कारखान्याचे माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, ॲड कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ, अधिकारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचेसह गुजरात, पंजाब, हरियाणा, ओरिसा आदी ६ राज्यांचे सहकार मंत्री तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांचेसह देशभरातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल यांनी आभार मानले. फोटो :- नवी दिल्ली येथे निरा भिमा कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे समवेत स्वीकारताना अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे व संचालक मंडळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा