Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६

शाळा - कॉलेज आणि कोचिंग क्लास मध्ये मुला -मुलींचा मोबाईलचा "गैरवापर" पालकांच्या जीवाची घालमेल" वाढवणारा, लव्ह मॅरेज चा

*इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* ) ,*सांगली* *मोबाईल - 8983587160*
शाळा - कॉलेज आणि कोचिंग क्लास मध्ये मोबाईलचा "गैरवापर" पालकांच्या जीवाची घालमेल" वाढवणारा, लव्ह मॅरेज चा "सुकाळ" आणणारा आणि मोबाईलच्या वापरावर "प्रश्नचिन्ह" निर्माण करणारा ठरत आहे.त्यामुळे शाळा - कॉलेज आणि कोचिंग क्लास मध्ये "मोबाईल" वर *बंदी"असावी का ??? पालकांच्या डोळ्यात अंजन. घालणारा एक "झणझणीत" लेख ! *पालकांच्या डोळ्यात धूळफेक ! Snap Chat & Instagram (स्नॅप चॅट % इंस्टाग्राम ) वरून विद्यार्थीनींचे तरुणांशी लफडे !* घरात "मुलीचा मोबाईल" पालक कधी - कधी तपासतात, परंतु त्यांना त्यात वावगे काही दिसतं नाही तथापि आज स्नॅप चॅट आणि "इन्स्टा" च्या माध्यमातून तुमची मुलगी कोणाच्या "संपर्कात" आहे, कुणाशी "अफेयर" करत आहे हे पालकांना कधीच कळत नाही. कारण या दोन "ऍप" मध्ये अशी "सोय" आहे,की ज्याच्याशी ती "संभाषण" करत असेल, जो "तिचा" *फॉलोवर्स" असेल ते एकमेकांशी "चॅट" करू शकतात, "व्हिडिओ" करू शकतात, आणि इन्स्टा वरूनपण चॅटिंग. करू शकतात.आणि धक्कादायक म्हणजे हे चॅट -व्हिडिओ डिलीटही करू शकतात व *लपवू" (हाईड) शकतात. शेजारी बसलेल्या पालकांना मुली सहज *"चुना" लावतात. धक्कादायक म्हणजे पालकांना याचा "थांगपत्ता" ही लागत नाही.कमाल आहे ना ?? *माझी मुलगी "समा" हिचे "ग्रॅज्युएशन" ! मोबाईल नसूनही कॉलेज मध्ये तिचा "प्रथम क्रमांक" !* सलग 5 वर्ष मोबाईल न वापरून देखील संपूर्ण कॉलेज मध्ये "प्रथम क्रमांक". येऊ शकतो हे माझी मुलगी समा इकबाल मुल्ला" हिने सिद्ध केले आहे. कॉलेज मध्ये मोबाईल न वापरणारी. समा ही एकमेव विद्यार्थिनी ! कॉलेजमध्ये मला "मोबाईल" नको,गरज असेल तर माझ्या "आईच्या मोबाईल मधून "शैक्षणिक माहिती" पाहीन असे सांगणारी समा ही "मोबाईल शिवाय" 1 ला क्रमांक पटकावू शकते मग इतर मुलींना काय *अडचण" आहे ??? पालक विद्यार्थ्यांना "मोबाईल" का देतात ?? 10 वी नंतर असा काय "चमत्कार" होतो, की "11 वीला" मुलीला मोबाईल द्यावाचं लागतो ?? वास्तविक शाळेत मोबाईल ची गरज"नसते, "कॉलेजमध्ये - कोचिंग क्लास" मध्येही ही मोबाईलची आवश्यकता नसते, मग मोबाईल विद्यार्थ्यांना का हवे ??? * परगावच्या विद्यार्थिनी असतील तर घरच्या लोकांच्या "संवादासाठी" साधा बटनचा मोबाईल "क्षम्य" आहे. परंतु शहरातचं कॉलेज असेल तर तरुणींना मोबाईल का हवा ?? *विद्यार्थ्यांची उपस्थिती - अनुपस्थिती चा Msg साठी व्हाट्सअप मोबाईल नंबर पालकांचाचं असावा !* सर्वसाधारणपणे काही विद्यार्थी शाळा - कॉलेजमध्ये उपस्थित नसतात. ठराविक काही मुली शाळेत जाते म्हणून *बॉयफ्रेंडसोबत" बाहेर फिरायला जातात,कॉलेजमध्ये काही मुली असाच प्रकार करतात. पालकांचा समज असतो की माझी मुलगी शाळा - कॉलेज मध्ये गेली आहे, परंतु पालकांच्या डोळ्यात ही शुद्ध "धूळफेक" असते. शाळा - कॉलेजच्या व्हाट्सअपग्रुपवर विद्यार्थी स्वतःचा मोबाईल नंबर देतात. जर तो किंवा ती विद्यार्थी "अनुपस्थित" असेल तर शाळेचा Msg त्या "विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर" जातो. आणि ती मुलगी महिन्यात कितीवेळा गैरहजर"आहे हे पालकांना अजिबात कळत नाही. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची "प्रगती" पाहण्यासाठी स्वतःचा" मोबाईल. नंबर आवर्जून द्यावा. *शाळा - कॉलेजच्या परिसरात CCTV कॅमेरा असावा !* शाळा - कॉलेज ने आपल्या "आवारात - ग्राउंड मध्ये" असे CCTV कॅमेरे लावायला हवेत जे पालकांच्या मोबाईलशी "कनेक्ट" असावेत. जेणेकरून विद्यार्थी मोबाईलवरून "गप्पा" मारतात की अभ्यास" करतात हे कळू शकेल. शाळेतील शिक्षकांचे "दुर्लक्ष" मुलींना "फावत" आहे.कारण क्लास मध्ये किती मुली "अनुपस्थित" आहेत, याची खातरजमा करत शिक्षकांनी मुलींना प्रश्न विचारायला हवेत. व "पालकांना" याची माहिती द्यायला हवी. *हिजाबचा गैरवापर होतो का ? याची "पालकांनी" खातरजमा करावी !* कॉलेज मध्ये काही मुलींना हिजाब. घालून पाठवले जाते. काही पालक हिजाब न घालता कॉलेजला पाठवतात. ज्यांच्या त्यांच्या अख्यत्यारीतील. हा प्रश्न ! वस्तुतः हिजाब घालून काही मुली कॉलेज कॅन्टीन. मध्ये तास चुकवून बसत असतील, मुलांशी "गप्पा" मारत असतील तर ?? हिजाब आहे म्हणजे सर्व आलबेल". आहे,हे पालकांनी*श समजू नये. दुसरी बाब म्हणजे कॉलेज. मध्ये वर्गात न जाता काही मुली "लॅब" मध्ये अर्थात एका मोकळ्या हॉल मध्ये बसत असतील, तरुणांसोबत. बसत असतील आणि व्हिडिओ कॉल आणि फोन लावून तासन - तास बोलत असतील तर ??? याची माहिती त्या प्रामाणिक पालकांना. कधी कळणार ?? कारण पालक आपल्या मुलींना हजारो रुपये देऊन, मुलींच्या फी"ची व्यवस्था करतो,शाळा -कॉलेज मध्ये सोडतो परंतु तिचं मुलगी कॉलेज मध्ये पाऊल. ठेवल्या - ठेवल्या आपल्या मित्राला भेटायला. जातं असेल, ते ही "लेक्चर" चुकवून ..तर पालकांनी देखील *डोळस व्हायला नको का ???. केवळ मुलींवर "डोळे बंद". ठेवून "विश्वास" ठेवायला नको, स्वतः पालकांनी कॉलेजमधे जाऊन किंवा त्यांच्या शिक्षकांच्या संपर्कात. राहून वेळोवेळी त्यांनी माहिती घ्यावी ! आज लव्ह मॅरेज. च्या सापळ्यात अनेक मुली सापडत आहेत. पालकांनी "बेसावध" राहिल्याने असे प्रकार घडत आहेत. *बारस्कर अकॅडमी मध्ये व्हिडिओ/फोटो ची व "लँडलाईन" ची सोय !* सांगलीतील सुप्रसिद्ध "बारस्कर अकॅडमी" मध्ये पालकांना मुलांची "प्रगती" पाहण्यासाठी अथवा विद्यार्थी "अभ्यास" करतो अथवा नाही हे कळण्यासाठी. व्हिडिओ /फोटो" ची सोय करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने कोचिंग क्लास मध्ये कोणते "शिक्षण" घेतले, आज - काय केले ? हे त्या फोटो/व्हिडिओ. मुळे पालकांना तात्काळ दिसते. त्याशिवाय मुलांना पालकांना फोन* करायचे असेल तर लँडलाईन"* ची "सुविधा" उपलब्ध करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण पद्धतीने मुलाने /मुलीने कोचिंग क्लास मध्ये कोणते शिक्षण घेतले,काय केले?? हे पालकांना तात्काळ दिसते. बारस्कर अकॅडमी चे अनुकरण अन्य कोचिंग क्लास संस्थेने करणे अगत्याचे आहे. *शाळा - कॉलेज - कोचिंग क्लास मध्ये "थम सिस्टीम" असावी !* विद्यार्थी किती वाजता शाळेत आला - कोचिंग क्लास मध्ये दाखल. झाला आणि शाळा /कोचिंग क्लास सुटल्यानंतर कधी गेला याची माहिती "थम सिस्टीम" च्या माध्यमातून पालकांच्या मोबाईलवर" जर पाठवण्याची सोय असेल तर विद्यार्थी शाळा - कॉलेज -कोचिंग क्लास - अकॅडमी मध्ये "तास" चुकवणार नाहीत. घरात Msg जाईल या भीतीने. कॉलेज मध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसतील.अशाप्रकारची सुविधा प्रत्येक शाळा /कॉलेज/अकॅडमी मध्ये असायला हवी. *पालकांनी महिन्यातून एकदा शाळा -कॉलेज मध्ये अचानक भेट द्यावी !* वास्तवीक आपल्या मुलांच्या "भवितव्यासाठी" पालक अहोरात्र कष्ट करतात, रक्ताचे पाणी" करतात तथापि पालकांच्या कष्ठाला मुलांच्या प्रामाणिकतेची जोड" मिळायला हवी. अन्यथा पालक काबाडकष्ट करणार आणि आपली मुले शाळा /कॉलेज च्या नावाखाली *Enjoy* करणार,असे होता कामा नये. म्हणूनच पालकांनी मुलांना न सांगता शाळा /कॉलेज मध्ये जाऊन "परस्पर" शिक्षकांशी संवाद साधावा, मुलांच्या प्रगतीसंदर्भात विचारणा करावी. असे केल्यास मुलगा / मुलगी नित्यनियमाने शाळेत येतात का ?? त्यांचे वागणे कसे आहे ?? याची माहिती पालकांना मिळू शकते. या लेखाच्या माध्यमातून अतिशय "प्रामाणिकपणे समाजप्रबोधन केले आहे. प्रत्येक पालकांनी लेख वाचून आत्मचिंतन" करावे ही विनंती ! लेख प्रदीर्घ झाला आहे, त्याबद्दल क्षमस्व !l आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* ) संपादक - सांगली वेध संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली. *मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा