Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० सप्टेंबर, २०२६

आवाटी येथील शेतकऱ्याच्या मुलीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये उत्तुंग भरारी... महसूल प्रशासनाच्या दुय्यम निबंधक पदा करिता उत्तीर्ण एन टी सी मधून राज्यात आली तिसरी

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
मौजे.आवाटी. ता.करमाळा येथील शेतकरी श्री.मोहन एकनाथ खताळ यांची मुलगी कु. मनिषा सविता मोहन खताळ हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत तिची दुय्यम निबंधक सहाय्यक महसुल आधिकारी पदी निवड झाली आहे. N.T,C मुलींमधून ती राज्यात 3 री आली आहे. तिचा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ पार पडला यामध्ये श्री.बाबु भाई मुलाणी,साजिद मुलाणी.श्री.ताहेर खान,श्री.नानासाहेब खताळ.(तलाठी),व तिचे वडिल श्री.मोहन खताळ,श्री.विश्वनाथ शिंदे,श्री. दिपक शिंदे सर उपस्थित होते.
कु. मनिषा सविता मोहन हिचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.मनिषा खताळ हिचे प्राथमिक शिक्षण वर्ग 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवाटी येथे झाले.तिला मराठी,विज्ञान, गणित, इंग्लिश या विषयात विशेष आवड होती.पहिली पासूनच ती अव्वल असायची. माध्यमिक शिक्षणासाठी ती डॉ.हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे, ता.करमाळा येथे गेली.वर्ग 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण येथे झाले. 10 वीच्या वर्गात ती 92% घेऊन प्रथम आली होती. वडीलांसोबत शेतात खुरपणी,ऊसाला खत टाकणे,अशी कामे करीत ती शिकली.पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ती शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात बारामती विज्ञान शाखा येथे होती. तिथे 12 वीच्या वर्गात 87.23% घेऊन ती उत्तीर्ण झाली. कोरोनो ह्या रोगाच्या महामारीत ती गावाकडे आली.पुढील शिक्षणासाठी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शीचे श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे प्रवेश घेतला.लॉकडाऊन लागल्यानंतर पदवीचे पहिली दिड वर्षे(1.5)ऑनलाईन शिकुन, दिड वर्ष प्रत्यक्ष शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे शिक्षण घेतले. श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून विज्ञान शाखेतून पदवीधर झाली.पदवीला 87.36% घेऊन ती विद्यापीठात प्रथम आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी ती मागील तीन वर्ष पुणे येथे होती. आत्ता तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत दुय्यम निबंधक सहाय्यक महसुल आधिकारी पदी निवड झाली आहे. तिच्या यशाचे गमक विचारले असता ती सांगते की, जिद्द,चिकाटी,सातत्यपूर्ण प्रयत्न यातुनच यश मिळते. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अविरत पणे प्रयत्न केले पाहीजे असे कु.मनिषा खताळ सांगते तिच्या या यशाबद्दल आवाटी येथील ग्रामस्थांनी तसेच वली बाबा दर्गा ट्रस्ट कमिटीने देखील तिचे विशेष अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा