Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

जीसीसी टीबीसी परीक्षेत संजीवनी तांबे ९७.५% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम, अंकिता भोरे द्वितीय तर अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याचे विशेष उल्लेखनीय यश भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* अकलूज (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले. संस्थेतील संजीवनी लक्ष्मण तांबे हिने इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट स्पिड या विषयात ९७.५ गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. अंकिता तुकाराम भोरे हिने याच विषयात ९४.५% गुण प्राप्त करत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. तर प्रियांका डांगे हिने इंग्रजी ३० मध्ये, किरण घोळवे व संजीवनी तांबे यांनी मराठी ३० मध्ये आणि प्रियांका पाटील व प्रियांका डांगे यांनी इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात ९४% गुण प्राप्त करत तालुक्यात विभागून तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे संपूर्णतः अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याने मराठी ३० विषयात ८९% व हिंदी ३० स्पिड विषयात ९०% गुण प्राप्त करत विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केले. परीक्षेमध्ये त्यास वाचनकर्ता म्हणून प्रतीक होनमाने याचे सहकार्य लाभले. विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी :- इंग्रजी ३० श.प्र.मि. स्पीड या विषयात - संजीवनी तांबे ९७.५% प्रथम, अंकिता भोरे ९४.५% द्वितीय, प्रियांका डांगे ९४% तृतीय. मराठी ३० श.प्र.मि. या विषयात :- किरण घोळवे व संजीवनी तांबे ९४% विभागून प्रथम, प्रतिक्षा थोरात व धनश्री राखुंडे ९३% विभागून द्वितीय, नूरजहान बागवान ९१.५% तृतीय. इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात :- प्रियांका पाटील व प्रियांका डांगे ९४% विभागून प्रथम, संजीवनी तांबे ९३.५% द्वितीय, किरण घोळवे ९२.५% तृतीय. हिंदी ३० श.प्र.मि. या विषयात जिब्रान तांबोळी ९०% प्रथम, अंजली गोंड ८८% द्वितीय असे दैदिप्यमान यश संपादन केले. या परीक्षातील स्पीड विभागामध्ये अनुराधा गायकवाड, संजीवनी तांबे, किरण घोळवे, नूरजहान बागवान यांनी ४० पैकी ४० गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले तर पत्रलेखन, तक्ता व ईमेल लेखन या विभागामध्ये औदुंबर कटके, प्रियांका डांगे, प्रतीक्षा थोरात, किरण घोळवे यांनी ३५ पैकी ३५ गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत जीसीसी टीबीसी मराठी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मनिट व इंग्रजी ३०,४०,५० व ६० श.प्र.मि. या विषयांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभागात लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात. जीसीसी-टीबीसी परीक्षेत दैदीप्यमान यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे, किरण भगत, ज्ञानदीप जवंजाळ व प्रज्ञा गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा