*लोहारा -प्रतिनिधी
यशवंत भुसारे
टाइम्स 45 न्यूज मराठी
विरोधी पक्षात राहून धाराशिव जिल्ह्याचा अपेक्षित विकास होत नाही, असे सांगत सत्तेतील महायुती सरकारमध्ये प्रवेश केलेल्या लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत गेलात, मग निधी कुठे आहे? असा थेट सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था चिंताजनक होत असताना केवळ शेताच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून किंवा शेतकऱ्यांचे सांत्वन करून प्रश्न सुटणार नाही. धाराशिव जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत खासदारांनी मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षांतर करून सत्तेत गेलेले खासदारांनी केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यापुरती भूमिका न ठेवता शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक पॅकेज मंजूर करून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा’ म्हणून गौरवला जातो; मात्र आज हाच पोशिंदा पावसाअभावी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी चालढकल न करता तातडीने सरकारला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.जिल्ह्याचा विकास होत नाही म्हणून सत्तेत गेलात; आता सत्तेचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडणार? अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन फडात अक्षरशः ट्रॅक्टर चालवत असुन हा प्रश्न सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत गेले; मग निधी कुठे? खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून द्यावी शेतकऱ्यांची मागणी
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेत गेले; मग निधी कुठे? खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हेक्टरी ५० हजारांची मदत मिळवून द्यावी शेतकऱ्यांची मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा