Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

*अकलूज येथे 'महिला सन्मान चषक' क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन;* *शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ' ठरली विजेती !*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


संग्रामनगर-अकलूज यांच्या वतीने आयोजित महिला सन्मान चषक २०२६-२७ या भव्य महिला क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ संघाने प्रथम पारितोषिक पटकावले,तर शंकरराव मोहिते महाविद्यालय,माळेवाडी या संघाला द्वितीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले.

​या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिवरत्न शिक्षण संस्था, डॉटर्स मॉम फाउंडेशन तसेच शिवरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

                ​स्पर्धेतील वैयक्तिक विजेत्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून रितिशा जाधव (शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-ब),उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मुस्कान दरवेशी (शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी),उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून अक्षता सावंत (शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ) आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सीमा धुमाळ (पोलीस वाइफ इलेव्हन) यांनी बाजी मारली.

​विजेत्या शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ संघातील खेळाडू:

वृषाली पवार,अक्षता सावंत, वैष्णवी मिसाळ,डॉ.आशा शेख मॅडम,डॉ.वैष्णवी शेटे मॅडम, स्वरांजली सावंत,स्वरांजली जाधव,कुसुम डांगी व साक्षी एकतपुरे यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

​या स्पर्धेत स्टार ऑफ अकलूज, शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ, सनराइज् इलेव्हन,एस.एम.पी. स्कूल,शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी,पोलीस वाइफ इलेव्हन अकलूज आणि शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-ब अशा एकूण ७ संघांनी सहभाग नोंदवला होता.

             ​स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आनंद पावशे सर यांनी केले तर सामन्यांचे पंच म्हणून मंजीत नवले सर व जयराज पावशे यांनी काम पाहिले.या स्पर्धेमुळे स्थानिक महिला खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून परिसरातून या आयोजनाचे कौतुक होत आहे.



_____________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा