Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

शेतकऱ्यांना दिलासा, अनधिकृत वीज वापरकर्त्यांना इशारा! जेऊर सह परिसरातील गावांमध्ये येत्या काही दिवसात महावितरणची धडक मोहीम; कृषी ग्राहकांना ८ तास वीजपुरवठ्यासाठी विशेष पथके

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
कृषी ग्राहकांना नियमानुसार ८ तासांचा वीजपुरवठा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने अनधिकृत कृषी वीज जोडण्या व नियमबाह्य वीज वापराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर चिखलठाण उमरड, शेटफळ, पोपळज, केडगाव तसेच परिसरातील गावांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी फिडरवरील अनधिकृत वीज वापरामुळे अधिकृत कृषी ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. अनधिकृत भारामुळे फिडर व वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असून, कमी दाबाचा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत कृषी ग्राहकांच्या हितासाठी अनधिकृत वीज वापरावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याची भूमिका महावितरणने घेतली आहे. या मोहिमेदरम्यान संबंधित कृषी फिडर व परिसरातील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात येणार आहे. अनधिकृत जोडणी, वीज चोरी किंवा नियमबाह्य वीज वापर आढळल्यास विद्युत कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल. कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यकतेनुसार बारामती व सोलापूर येथून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी व विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरील उपलब्ध मनुष्यबळासोबत अतिरिक्त पथकांच्या मदतीने तपासणी व कारवाईची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. अशी माहिती माननीय श्री प्रभास भोयर साहेब उप कार्यकारी अभियंता विद्युत जेऊर उपविभाग तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी दिली आहे चौकट घेणे महावितरण शेतकऱ्यांना ८ तास विज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. महावितरण चे सध्या चे वीज वितरण चे जाळे सर्व अधिकृत ग्राहकाना ८ तास बीज पुरवठा करण्यास सक्षम आहे. सद्य स्थितीत महावितरण च्या जाळ्यावर अतिरिक्त भार वाढल्यामुळे काही ठिकाणी अधिकृत ग्राहकाना ८ तास वीज पुरवठा करणे शक्य होत नाही. येत्या काही दिवसात वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने अनधिकृत वीज ग्राहकांवर वीज कायद्या नुसार कार्यवाही ची मोहीम प्रभीपणे राबवून अधिकृत ग्राहकाने ८ तास वीज पुरवठा करणार. आवश्यकता वाटल्यास अधिक ची पथके स्थापन करण्यात येतील मा. प्रभास भोयर उपकार्यकारी अभियंता जेऊर उपविभाग तालुका करमाळा जिल्हा सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा