इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
युवाशक्ती ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संशोधनाची जोड मिळाल्यास नव्या बलवान भारताच्या निर्मितीला गती मिळेल. जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि संशोधनवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीची प्रमुख साधने आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच त्याचे नावीन्यपूर्ण कल्पना व प्रयोगांमध्ये रूपांतर करावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता पंडित शेळके यांनी केले.
टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), खडकी येथे आयोजित आविष्कार स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १६४ विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील ८६ संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, मानवविद्या, वाणिज्य आणि समकालीन विषयांवरील प्रकल्पांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न, नवकल्पना आणि संभाव्य उपाय मांडले. प्रकल्पांची संकल्पना, संशोधन पद्धती, नावीन्यपूर्णता आणि उपयुक्तता यांचा उपस्थितांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देत त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष प्रकल्पांचे स्वरूप देण्यासाठी आविष्कार स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सदस्य रमेश अवस्थे, अजय सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, जुगल नाईक, राजेंद्र लेले, गौरी माटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक
आविष्कार समन्वयक स्वप्नील सातपुते यांनी तर सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. आभार सोनाली गेडाम यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६
कल्पना, जिज्ञासा अन् संशोधनातून नवा बलवान भारत घडेल : पंडित शेळके.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा