Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

इंदापूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक इंदापूर शहरातून संपन्न झाली. विद्यालयातील ६५० विद्यार्थी विद्यार्थिनींनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. प्रथमतः सकाळी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका पुष्पा काळे, शाळा समिती सदस्य विजयकुमार शिंदे, विठ्ठल ननवरे, कैलास कदम, सेवानिवृत्त शिक्षक पोपट जाधव, छाया जाधव, माजी विद्यार्थी सुनील जाधव, अविनाश बाळगानुरे इत्यादींच्या शुभहस्ते, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली ही मिरवणूक रामवेस, पोरा पोरांची चावडी, पानधरा, नेहरू चौक, नगरपरिषद, दर्गा मज्जिद चौक, संभाजी चौक या मार्गे परत विद्यालयात दाखल झाली. जवळपास तीन तास सुरू असलेल्या मिरवणुकीत विद्यालयातील झांज पथक, लेझीम पथक, टिपरी नृत्य, तलवारबाजी दांडपट्टा प्रात्यक्षिके इंदापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यामुळे मिरवणुकीची रंगत वाढली. शहरात अनेक ठिकाणी कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष श्री. ननवरे कुटुंबीय, माजी नगरसेविका राजश्री मखरे, श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मुकुंद शहा, नगराध्यक्ष भरत शहा तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीरांना अभिवादन केले. यावेळी अनेकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटाचे वाटप केले. कै. धनंजयबापू वशिंबेकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने विद्यालयातील सर्व मुलांना दरवर्षीप्रमाणे गोड खाऊचे वाटप करण्यात आले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा