इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
अभियंता दिनाचे औचित्य साधून विद्या प्रतिष्ठान संचलित इंदापूर येथील पॉलीटेक्निक कॉलेज येथे आयोजित ‘विद्या टेकफेस्ट-२०२६’ या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेत ८६० विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्याचा आविष्कार सादरीकरण केले. विविध विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या टेकफेस्ट मध्ये राज्यातील १३ पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील सुमारे ८६० विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, पुणे येथील प्राचार्य डॉ. सुनील भीमराव ठाकरे यांच्या हस्ते तसेच डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. नितीन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील वेगाने होणारे बदल, उद्योगक्षेत्रातील नव्या संधी, कौशल्यविकास, नवोपक्रम आणि भविष्यातील तांत्रिक आव्हानांविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि इतर विद्यार्थ्यांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करावीत तसेच नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
टेकफेस्टमध्ये विविध अभियांत्रिकी शाखांनुसार पेपर सादरीकरण, डेव्हलपमेंट ऑफ प्लॅन अँड इलेव्हेशन ऑन शीट, ब्लाइंड सी प्रोग्रामिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, कॅड वॉर तसेच ॲप्टिट्यूड टेस्ट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
डेव्हलपमेंट ऑफ प्लॅन अँड इलेव्हेशन ऑन शीट या राज्यस्तरीय स्पर्धेत बीएमपी, सोलापूरच्या संकेत चंद्रकांत कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले. व्ही पी इंदापूरच्या आदित्य रोहिदास अटोळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेतेपद संपादन केले. कॅड वॉर स्पर्धेत व्हीपीपी, इंदापूरच्या अविनाश संजय घोरपडे यांनी प्रथम, तर स्वेरी कॉलेज, पंढरपूरच्या यशवंती दत्तात्रय पवार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. ब्लाइंड सी प्रोग्रामिंग स्पर्धेत व्हीपीपी, इंदापूरच्या बागवान अंजुम यांनी प्रथम, तर मुलाणी रिजवाना यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा ( ई अँड टीसी इंजिनिअरिंग विभाग) विजेते
ओम वाघमारे ( एम.ई. विभाग, एस.व्हि.एस. टेंभूर्णी), सलोनी मिसाळ (ई.ई. विभाग, एस. आय. ई.टी. पाणिव ),सानिका सांगर ( ई.जे. विभाग, एस.आय.ई.टी. पाणिव),
शिवम देशमाने ( ई.जे. विभाग, व्ही.पी.पी. इंदापूर),
विद्या चौधरी ( सी.ओ. विभाग, एस.व्हि.एस. टेंभूर्णी ), अक्षदा सरवदे ( सी.ई. विभाग, व्ही.पी.पी. इंदापूर), ॲप्टिट्यूड टेस्ट
स्पर्धेत शाखानिहाय शुभम दत्तात्रय मोरे, मणिकर्णिका नवनाथ कोलेकर, तेजल अशोक खरात, ओंकार विनोद हरजीत आणि यशराज सहदेव वाघ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पेपर सादरीकरण स्पर्धेत इ जे 5 के व्ही पी पी इंदापूर येथील शुभम रवींद्र मासाळ तसेच इंदापूर येथील एस बी पाटील कॉलेज मधील प्रथम वर्षातील सुजित हनुमंत घाडगे व आदित्य अण्णा निंबाळकर यांनीही प्रथम क्रमांक पटकाविला.
द्वितीय क्रमांकाच्या गटात एस व्हि एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी टेंभुर्णी येथील विद्या संदीप चौधरी व नाळे प्रांजली शिवाजी तसेच
व्हिपीपी इंदापूरच्या सी इ 1 के मधील स्मिता दिलीप मोरे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
टेकफेस्टमधील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना **प्रथम क्रमांकासाठी ₹१,०००, द्वितीय क्रमांका साठी ₹५००, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व ८६० विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
टेकफेस्टच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे, प्रा. सोमनाथ चिकणे, सचिव प्रा. रोहिणी गोरे आणि स्टुडंट चेअरमन ओमराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुनील शिंदे, प्रा. मयुर सुपेकर, प्रा. संतोष देवकाते, प्रा. सोमनाथ चिकणे, प्रा. दिनेश सावंत, प्रा. राजीव वाघमारे, प्रा. बापुसाहेब पवार, प्रा. सचिन पवार, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. सोनाली काळे व प्रा.सायली जगताप यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अभियंता दिनानिमित्त इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निकमध्ये ‘विद्या टेकफेस्ट-२०२६’ अंतर्गत ८६० विद्यार्थ्यांचा तांत्रिक कौशल्याचा आविष्कार.
अभियंता दिनानिमित्त इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निकमध्ये ‘विद्या टेकफेस्ट-२०२६’ अंतर्गत ८६० विद्यार्थ्यांचा तांत्रिक कौशल्याचा आविष्कार.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा