*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत द्वारे दिनांक २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत मौजे तामलवाडी येथील दलित वस्तीचा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याबाबत दिनांक २३/०९/२०२६ रोजी श्री धम्मपाल सुनील रणसुरे यांनी रितसर लेखी तक्रार निवेदनाद्वारे दिली होती त्याबाबत ग्रामसेवक श्री चैतन्य गोरे व प्रशासन ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी त्यांनी कुठलीही दखल न घेता जणू काही त्या तक्रारी निवेदनास केराची टोपली दाखवली असे निदर्शनास आल्यानंतर श्री धम्मपाल रणसुरे यांनी याबाबत सावंत शिवाजी रामकृष्ण माजी सैनिक तथा संस्थापक अध्यक्ष आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी यांना दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी येथील दलित वस्तीचा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याबाबत कळवल्यानंतर श्री सावंत यांनी तत्काळ तामलवाडी येथील दलित वस्तीला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाहणी करून त्याबाबत विचारपूस केले त्यावेळेस तेथे राहणाऱ्या लोकांनी पाणी मिळत नसल्याबाबत कळवले त्याबाबत श्री सावंत यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी एका लेखी निवेदनाद्वारे ग्रामसेवक/प्रशासक ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, तुळजापूर व तहसीलदार तहसील कार्यालय, तुळजापूर यांना व्हाट्सअपद्वारे निवेदन पाठवून विनंती करून त्या निवेदनामध्ये आम्ही आपणास या पत्राद्वारे अंतिम इशारा देत आहोत की, तामलवाडी येथील दलित वस्तीचा पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित तथा बंद आहे, वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, पाणीपुरवठा हा आमच्या मूलभूत हक्काचा प्रश्न असून हे अनुसूचित जाती जमातीवर होणारा अन्याय आहे, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत तामलवाडी येथील दलित वस्तीचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. जर सदर मुदतीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता समस्त दलित वस्तीतील महिला व नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी येथे "घागर मोर्चा" काढण्यात येईल व यानंतर होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं म्हटलं आहे या निवेदनावर दलित वस्ती येथील महिला व नागरिकाच्या स्वाक्षऱ्या आहेत या विषयाकडे संपूर्ण तामलवाडीचे लक्ष वेधले आहे.
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे तामलवाडी ता.तुळजापूर येथील ग्रामपंचायतवर २८ सप्टेंबर रोजी "घागर मोर्चाचा इशारा"*
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे तामलवाडी ता.तुळजापूर येथील ग्रामपंचायतवर २८ सप्टेंबर रोजी "घागर मोर्चाचा इशारा"*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा