*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कवी इंद्रजीत पाटील लिखित चिबाड या कवितासंग्रहास दहावा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे,शाखा - साेलापूरच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.श्रुती श्री.वडगबाळकर यांनी या पुरस्काराची अधिकृतपणे घाेषणा केली.कार्याध्यक्ष किशाेर चंडक,उपाध्यक्ष दत्ताअण्णा सुरवसे,प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ.नरेंद्र काटीकर,कार्यवाह वंदना कुलकर्णी,काेषाध्यक्ष बदिउज्जमा बिराजदार,इतर कार्यकारिणी सदस्य व सुज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत या साहित्य पुरस्काराची घाेषणा करण्यात आली.मसाप,शाखा साेलापूरच्या वर्धापन दिन व अभिजात भाषा दिनाच्या निमित्ताने स्व.विजयाताई जहागीरदार स्मृती साहित्य पुरस्काराने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण वार रविवार दि.-०४आॅक्टोबर २०२६ राेजी दुपारी साडेपाच वाजता लाेकमान्य टिळक सभागृह,श्री हिराचंद नेमचंद वाचनालय संकुल,चार हुतात्मा पुतळ्याजवळ,साेलापूर येथे हाेणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश लेखक व कवी डाॅ.शरद गाेरे उपस्थित राहणार आहेत.राेख रक्कम पाच हजार,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून चिबाडला हा दहावा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त हाेत आहे.मु.रूई,ता.बार्शी येथील या हरहुन्नरी व प्रतिभावंत साहित्यकाचे सर्वत्र कौतुक हाेत असून अभिनंदन व हार्दीक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
कवी इंद्रजीत पाटील यांच्या" चिबाड " या कवितासंग्रास दहावा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कवी इंद्रजीत पाटील यांच्या" चिबाड " या कवितासंग्रास दहावा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा