Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

रणजितसिंह मोहिते पाटील जुने संबंध करू लागले रिन्यू ; सोलापुरात बनशेट्टी, काडादीसह अनेकांच्या निवासस्थानी भेटी

*सोलापूर प्रतिनिधी*आणि * *टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर : एकेकाळी मोहिते पाटलांनी संपूर्ण जिल्ह्यावर राज्य केले आहे. त्यांचे आजही मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नंतर रणजितसिंह मोहिते हे आता आपल्या घराण्याचे जुने संबंध रिन्यू करत असल्याचे पाहायला मिळते. गुरुवारी त्यांनी सोलापूर शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक जुन्या सवंगड्यांच्या घरी भेटी दिल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही पत्रकारांच्या निवासस्थानी सुद्धा ते गेल्याचे दिसून आले. सोबत अक्कलकोट तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे हे सोबत होते. भेटीचे विशेष म्हणजे त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत बराच वेळ चर्चा केली. तसेच माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पती श्रीशैल बनशेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वर्गीय अप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच शफी इनामदार, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, माजी अध्यक्ष शंकर पाटील, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, मारुती घुले, शिवाजी सुरवसे, नागेश चितकोटी, रईस टीनवाला यांच्या हॉटेल एम्पायर ला भेट दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा