*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल (तळमजला) बांधण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या मागणीस अखेर यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने या कामासाठी रु. १ कोटी ५७ लाख ८० हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, करमाळा,जि.सोलापूर येथील न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल (तळमजला) बांधण्यासाठी सदर निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
करमाळा न्यायालयातील वकील बांधवांसाठी स्वतंत्र व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात,या उद्देशाने आमदार नारायण आबा पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.शासन निर्णयात या बांधकामासाठी रु. १५७.८० लाख खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे करमाळा न्यायालयातील वकील बांधवांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून,न्यायालयीन कामकाजासाठी अधिक चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
“करमाळा न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या लॉयर्स हॉलची मागणी पूर्ण झाल्याने वकील बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासाठी शासनाचे आभार,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
__________________'_''_________________________







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा