Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

*अकलूज परिसरात पर्जन्यवृष्टी होणेसाठी सामुदायिक रुद्राभिषेक व रुद्रपठण कार्यक्रम संपन्न.*

 *अकलूज प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज,महात्मा बसवेश्वर बहूउद्देशिय संस्था व उमाशंकर महिला रुद्र मंडळ यांच्यावतीने बसवेश्वर चौक येथे श्री महादेव मंदिरात श्रावण मासनिमित्त व अकलूज परिसरामध्ये पर्जन्यवृष्टी होणेसाठी श्री.ष.ब्र.१०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी वेळापूरकर यांच्या दिव्य सानिध्यात सामुदायिक रुद्राभिषेक व रुद्रपठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


         या कार्यक्रमात महाराजाचे स्वागत श्री व सौ योगेश गुळवे यांच्या हस्ते झाले तर महादेवास रुद्र अभिषेक व महाराजांची पद्यपूजा श्री व सौ शुभम जठार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ११ दांपत्य रुद्र पूजेसाठी बसले होते तसेच महिला व पुरुष समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,बृहन्मठ वेळापूर मठ येथील लहान शिष्य स्वामी यांच्या मधुर वाणीतून रुद्र पठण झाले.


         या कार्यक्रमाच्या शेवटी सार,भात,जिलेभी पापड महाप्रसाद याचे महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्था यांनी नियोजन केले होते.प्रा.रामलिंग सावळजकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तसेच ३१ ऑगस्ट श्रावण सोमवार महादेव मंदिर अकलूज चढावा अभिषेक शिवकुमार गुळवे व परिवार यांच्या हस्ते पहाटे ४.०० वाजता करण्यात आला व मल्लिकार्जुन मंदिर अकलूज चढावा अभिषेक श्री विलास क्षीरसागर व परिवार यांच्या हस्ते करण्यात आला. महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावण सोमवार संकष्टी चतुर्थी निमित्त बाळासाहेब गवसणे परिवार तसेच शिवकुमार गुळवे परिवार यांचे वतीने भाविकांना शाबूदाणा खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा