*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सालाबाद प्रमाणे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने सामाजीक उपक्रम राबवण्यात आला . यावर्षी गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी येथील निराधार गरजू 45 वृद्धांना गरजेच्या वस्तूंचे किटचे वाटप हाजन बशिरा गणीभाई तांबोळी तसेच हाजन झुबेदा हाजी अब्बास तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ महाराज देशमुख, ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी त्यांचे सहकारी व वृद्धाश्रमातील वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. . या प्रसंगी वृद्धाश्रमाच्यावतीने भाग्यश्री राऊत यांनी मनोगतामध्ये वृद्धांची कुटुंब संस्थेला खूप मोठी गरज असून सुद्धा वृद्धाश्रम निघत असल्याची खंत व्यक्त केली . गोविंद वृद्धाश्रमात दशरथ महाराज देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कडून वृद्धाश्रम चालवत असताना चे अनुभव त्यांनी सांगितले. ताहेरा फाउंडेशन नी आयोजीत केलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी वृद्ध हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांची कदर झाली पाहिजे.असे मत व्यक्त केले.वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर भाऊक होऊन हाजी अबुबकर भाई तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोविंद वृद्धाश्रमातील गरजूंना मदत करण्याचे ठरवले व पैगंबर दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर तांबोळी सर यांनी करताना ताहेरा फाउंडेशन ही सामाजिक संस्था गरजूंना नेहमीच मदत करणारी असून चांगला आणि समृद्ध समाज निर्माण व्हावा यासाठी ताहेरा फाउंडेशन वचनबद्ध असल्याचे आपल्या प्रस्ताविकात सांगितले. ताहेरा फाउंडेशन कडून मिळालेल्या किट मुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद ताहेरा फाउंडेशन मधील सदस्य व पदाधिकाऱ्यांना आशिर्वाद देणारा दिसून येत होता. वृद्धाश्रमाला ताहेरा फाउंडेशन सारखी मदत इतर सामाजिक संस्थानी , दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहन या वेळेला दशरथ महाराज यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा