Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

पाऊस नाही, पाणी नाही; मग बाप्पाचे विसर्जन कुठे करायचे ? नदी-नाले, धरणे, विहिरी कोरडे ठाक; भिषण परिस्थिती

लोहारा प्रतिनिधी* *यशवंत भुसारे* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
लहरी पावसाने पाट फिरवल्याने नदी-नाले, धरणे आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणरायाच्या विसर्जनाचा प्रश्र गणेश मंडळांसमोर उभा ठाकला आहे. दरवर्षी जलाशयांमध्ये भक्तिभावाने श्रींचे मनोभावे विसर्जन केले जाते; मात्र या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पाण्याअभावी विसर्जनासाठी जागा शोधण्याची वेळ मंडळांवर आली आहे. बाप्पाच्या स्वागताचा उत्साह असला, तरी निरोप देण्यासाठी पाणीच नसल्याने गणेश मंडळांसमोर मोठा विहिरीतून नाही तर पोहऱ्यात कोडून येणार अशी भिषण पेच निर्माण झाला असून परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी योग्य पर्यायी व्यवस्था तातडीने उपलध्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व गणेश मंडळांकडून व्यक्त होत आहे. सध्या लोहारा तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कामधंदा सोडून पाण्याच्या शोधात वावरण्याची वेळ संख्या तालुक्यातील नागरिकांवर आली आहे. शेतकरी वर्ग चिंतेत तर शेतमजुरांना कामे नसल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणे मुश्कील झाले आहे. कामाच्या शोधात असलेले मजुर व शेतकरी सहया गावाच्या पारावर बसून पावसाची असं धरून आहेत लहरी पाऊस येईल की नाही याचा भरोसा नसल्याने शेतकरी हैराण तर मजुर परेशन आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा