Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

तुळजापूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी --शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
तुळजापूर तालुकासह संपूर्ण धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्हा मध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने तुळजापूर येथे आकाश मोर्चा करण्यात आला होता या मोर्चा प्रसंगी सुरतगाव ता. तुळजापूर येथील शेतकरी कृष्णा गुंड यांनी पवनचक्कीच्या संदर्भात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रसंगावधान राखत तो प्रयत्न अयशस्वी ठरला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी याप्रसंगी विविध घोषणांनी देण्यात आले
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी नागरिक सहभागी झाले होते तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, बाजरी, मका, द्राक्ष बाग पावसाअभावी सर्व पिके जळाली आहेत. तरी पंचनामा चा फार्स न करता व कापणी प्रयोग चा देखावा न करता कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकयांना मदत करण्यात यावी. खालील सर्व मागण्यांचा विचार करण्यात यावा. असेही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
१) तात्काळ दुष्काळ जाहीर करावा दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने औपचारिक निकषांची वाट न पाहता तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. २) हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी - शेतकरी संकटात सापडल्याने त्यांना प्रति हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे. ३) कर्जमाफी आणि नवीन पीककर्ज सर्वसमावेशक, कर्जमाफी योजना लागू करावी. आणि तात्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. चालू पीक कर्जाचे व्याज माफ करावे. ४) प्रोत्साहन पर अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकयांचे प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपयांवरून थेट 1 लाख रुपये पर्यंत करण्यात यावे. ५) पिक विमा योजना पिक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई मिळवून द्यावी. ६) पाणी आणि चारा छावण्या जनावरांसाठी पिण्याच्या पाणी ची आणि चारा छावण्या उपलब्ध कराव्यात, ७) रोजगार हमी योजना ग्रामीण भागात हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजना मजुरांची कामे तत्काळ सुरू करावीत. ८) विहीर व बोर अधिग्रहण बोरी धरणात केवळ 7% टक्के मृत साठा उरलेला आहे. त्यामुळे तुळजापूर शहर, नळदुर्ग शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथे गरज असेल तिथे विहीर व बोर अधिग्रहण करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ९) विद्यार्थ्यांना शालेय फीस व शिष्यवृत्ती माफ करून सवलत देण्यात यावे. तसेच एस. टी. महामंडळ पास मोफत देण्यात यावा. १०) तालुक्यातील महिला शेतकरी बचत गटांचे कर्ज वसुली थांबवून व्याज माफ करावे. तरी वरील सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित मदत करावी. अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशाराही या नियोजनाद्वारे देण्यात आला आहे
हे निवेदन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांना तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना देण्यात आले हे निवेदन नायब तहसीलदार काळे मॅडम यांनी स्वीकारले याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर मा. अध्यक्ष अँड धीरज पाटील तुळजापूर तालुका अध्यक्ष अरविंद बेडगे तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष तथा नगरपरिषदेचे गटनेते अमोल कुतवळ तसेच असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा