*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील विहाळ येथील
‘शिवगिरी ऍग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड’ कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा’ अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी धार्मिक परंपरेनुसार श्री सत्यनारायण महापूजा, विधीवत होमहवन आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले.
या सोहळ्यास पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सभासद, कामगार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विश्वासावर गळीत हंगाम यशस्वी करणार
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "शेतकरी बांधव आणि सभासदांच्या सहकार्यामुळेच कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आणि कामगारांचे परिश्रम यांच्या बळावर शिवगिरी ऍग्रो शुगर वर्क्सचा हा दुसरा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण व्यवस्थापन कटिबद्ध आहे." तसेच आगामी हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला आणि वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे सांगत सर्व शेतकरी बांधवांना आगामी गळीत हंगामाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या मंगलमय सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक कालिदास (आबा) सावंत(चेअरमन शिवगिरी), शिवाजी सावंत सर(चेअरमन,राजवी ॲग्रो), कारखान्याचे व्हाईस चेअरमन संजय कालिदास सावंत, धाराशिव जिल्हा परिषद सदस्य धनंजय (दादा) सावंत, किरण सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय तोडकरी, संचालक अजिंक्य (भैय्या) सावंत यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
शिवगिरी ऍग्रो शुगर’चा द्वितीय बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न! आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना कटिबद्ध; सत्यनारायण महापूजा व होमहवनाने शुभारंभ
शिवगिरी ऍग्रो शुगर’चा द्वितीय बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न! आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना कटिबद्ध; सत्यनारायण महापूजा व होमहवनाने शुभारंभ
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा