*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दि. 16/10/2026 रोजी सकाळी 07/00 वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील शाहू नगर परिसरातील शिंदे हॉस्पिटलसमोर असलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे आरोपी शकील इस्माईल तांबोळी (वय 53, रा. शाहू नगर, करमाळा) याच्या ताब्यातील जागेत अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 च्या नियमाने उल्लंघन करून विक्रीसाठी साठवून ठेवलेला बेकायदेशीर पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सौ. रेणुका रमेश पाटील यांच्या उपस्थितीत आणि पंचांसमक्ष जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजणी करण्यात आली. यामध्ये विमल पान मसाला, व्ही 1 सुगंधित तंबाखू, हिरा पान मसाला, रॉयल 717, आरएमडी, एम सुगंधित, रजनीगंधा, विविध रंगांच्या पॅकेटमधील विना लेबल सुगंधित तंबाखू तसेच रत्ना 3000 सुगंधित तंबाखू असा एकूण 2,67,160/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शकील इस्माईल तांबोळी वय 53, रा. शाहू नगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर याच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन गु.र.नं. 926/2026, भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123, अन्न सुरक्षा व मानके अधि. 2006 चे कलम 26(2)(I), 26(2)(II), 26(2)(IV), 27(3)(II), 22, 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अतुल कुलकर्णी सर, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. अंजना कृष्णा व्ही एस सहाय्यक पोलीस अधीक्षक, करमाळा उपविभाग करमाळा, श्री रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली महिला सहा. पोलीस निरीक्षक, म्हस्के, सहा. पोलीस निरीक्षक, भैरवनाथ पाटील, पोहवा. मंगेश पवार, पोहवा अभिजित मोहोळकर, पोहवा बाळसराफ, पोहवा योगेश खराडे, पोलीस अंमलदार संभाजी पवार, गणेश गुटाळ, अनिल निकम, सोमनाथ गावडे, व महिला पोलीस अंमलदार विद्या इंगोले अंमलदारांच्या पथकाने पार पाडली आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सपोनि भैरवनाथ पाटील ने. करमाळा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा पोलिसांची धडक कारवाई करमाळा शहरातील शाहू नगरातून 2 लाख 67 हजार 120 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त! आरोपी शकील तांबोळी करमाळा पोलिसांच्या ताब्यात
करमाळा पोलिसांची धडक कारवाई करमाळा शहरातील शाहू नगरातून 2 लाख 67 हजार 120 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त! आरोपी शकील तांबोळी करमाळा पोलिसांच्या ताब्यात
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा