Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

*शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सवनिमित्त बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.*

*अकलूज-- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात ‘सृजनरंग महोत्सव २०२६-२७’ निमित्त विद्यार्थ्यांच्या क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे शारीरिक आणि मानसिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले.विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतही आपले कौशल्य सिद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले.खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण,निर्णय क्षमता,शिस्त आणि संघभावना विकसित होते.विजय मिळविण्या इतकेच पराभवातून शिकणेही महत्त्वाचे असून प्रत्येक विद्यार्थ्याने खिलाडूवृत्ती जपावी. असे त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन केले.महाविद्यालयीन जीवनात अभ्यासा बरोबरच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्वाचे स्थान आहे.विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी मिळावी,त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत आणि त्यांना विविध क्षेत्रांत यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘सृजनरंग महोत्सवा’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. बॉक्स क्रिकेट स्पर्धे दरम्यान विद्यार्थ्यांनी मैदानावर उत्साह, जिद्द आणि संघ भावनेचे दर्शन घडविले.प्रत्येक संघाने विजयासाठी प्रयत्न करताना खेळातील नियमांचे पालन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेत चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेत मुलांचे १५ आणि मुलींचे १५ अशा एकूण ३० संघांनी सहभाग नोंदविला. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी संघभावना,खिलाडूवृत्ती,शिस्त आणि सांघिक समन्वयाचे दर्शन घडवत स्पर्धेत चुरशीने सहभाग घेतला.यास्पर्धेत बी.ए.भाग ३ हिंदी वर्गाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकाविला.द्वितीय क्रमांक बी.कॉम.भाग एक,तृतीय क्रमांक विभागून बारावी विज्ञान व बी. एस्सी भाग एक या वर्गाने क्रमांक पटकावले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर, सृजनरंग महोत्सव समन्वयक डॉ.विश्वनाथ आव्हाड,विविध विभागातील प्राध्यापक वृंद,क्रीडा विभाग,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा