*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सध्या करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असून राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत निधी दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भरतभाऊ अवताडे यांनी केली आहे
याबाबत अधिक माहिती देताना अवताडे पुढे म्हणाले की आमचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना आमचे शिष्टमंडळ भेटणार असून आम्ही करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट त्यांना दिवाळीपूर्वी भरीव मदत निधी त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी आम्ही करणार आहोत असे श्री अवताडे यांनी बोलताना सांगितले
करमाळा तालुक्यातील भिषण दुष्काळी परिस्थिती बाबत अधिक माहिती देताना श्री अवताडे पुढे म्हणाले की सध्या तालुक्यात सन 1972 पेक्षाही परिस्थिती गंभीर असून सध्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने कधीच हिरावून नेला आहे सध्या तालुक्यात चारा टंचाई पाणीटंचाई जाणवत असून शेतकऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत जगावे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे भयानक हाल सध्या पहावयास मिळत आहे तेव्हा शेतकरी वर्गांच्या भयानक हाल पाहता राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत निधी द्यावी यासाठी आमचे शिष्टमंडळ लवकरच आमचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम यांना भेटणार असल्याचे श्री अवताडे यांनी बोलताना सांगितले
रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना भरीव मदत निधी द्यावा,,,,,,,,, पंचायत समिती सदस्य भरतभाऊ अवताडे यांची मागणी
राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना भरीव मदत निधी द्यावा,,,,,,,,, पंचायत समिती सदस्य भरतभाऊ अवताडे यांची मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा