Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

जयराज सहकारी पतसंस्थेला २४ लाखाचा नफा. सभासदांना ११ टक्के लाभांश . कर्मचाऱ्यांना२५ टक्के बोनस

*अकलूज - प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
माळशिरस तालुक्यातील आनंदनगर - अकलूज येथील जयराज सहकारी पतंस्थेला अहवाल सालात २३लाख १८ हजार रुपये ऐवढा निव्वळ नफा मिळालेला असुन सभासदांना ११ टक्के लाभांश तर कर्मचाऱ्यांना २५ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन शशिकांतराव माने-पाटील यांनी दिली. जयराज संस्थेची वार्षिक सभा चेअरमन शशिकांतराव नारायणराव माने-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अहवाल वाचन संस्थेचे मॕनेजर विजयराव भोसले यांनी केले.सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
चेअरमन शशिकांतराव माने-पाटील यांनी आनंदनगर , अकलूज ,बागेचीवाडी,चाकोरे,गिरझणी, कोंडबावी,वटफळी, संग्रामनगर , माळशिरस परीसरातील जनतेच्या, विकासासाठी उन्नतीसाठी स्थापन केली. दरवर्षी गरजु, छोटे छोटे उद्योगधंदा करणारे, शेतकरी बांधवांना शेती अवजारे, घरबांधणे, मुलांच्या लग्नासाठी, मुलांना शिक्षणासाठी वेळोवेळी कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येते असल्याचे संस्थेचे सचिव विजयकुमार भोसले यांनी सांगून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगीतला. संस्थेचे भागभांडवल रुपये २४६५४३५ ऐवढे असुन संस्थेत सुमारे १६०० सभासद आहेत. असुन अहवाल सालात सुमारे २४ लाख १८हजार रुपये नफा झालेला आहे. ११ टक्के प्रमाणे सभासदांना सुमारे ८२११९७ रुपये लाभांश वाटप करणार आहे.यावेळी व्हाईस चेअरमन बाळासाहेब शिंदे,युवानेते जयराज माने-पाटील ,संचालक गंगाधर चव्हाण ,जनार्धन चव्हाण,अशोक शेळमकर ,गोविंद तोरणे,विठ्ठल शेळमकर,संजय गायकवाड ,वेताळ पवार, संतोष घाडगे , आदि मान्यवर व सभासद यावेळी बहुसंख्येने उपस्थित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा