*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. एकीकडे दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरलेली असतानाच, दुसरीकडे सांगली आणि लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
सांगलीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लॉजवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, तर लातूरमध्ये एका एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेज तरुणीवर रस्त्यात अडवून खंजिराने जीवघेणा हल्ला केला.
सांगलीत शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून सध्या सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपींनी या तरुणीला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजण्यात आले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर दोघांनी अत्याचार केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला मारहाणही करण्यात आली.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनीने हिंमत दाखवत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ सामूहिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य संशयित शार्दुल पाटील (वय 21, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) याला अटक केली आहे, तर दुसरा संशयित सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) यालाही संशयित आरोपी म्हणून नामांकित करण्यात आले आहे. घटनेतील दुसरा संशयित प्रथम पाटील फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लातूरमध्ये कॉलेजवरून घरी जाणाऱ्या तरुणीवर हल्ला
लातूर शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीवर दिवसाढवळ्या हल्ला करण्यात आला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी जात असताना, रोहित पोहरे नावाच्या तरुणाने तिला रस्त्यात अडवले. "मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू माझ्याशी का बोलत नाहीस?" असा जाब विचारत रोहितने तिच्यावर जवळ असलेल्या खंजिराने सपासप वार केले.
या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. मात्र, परिसरातील नागरिकांनी आणि जमावाने तत्काळ मध्यस्थी करत आरोपी रोहित पोहरे याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र हादरला! लातुरमध्ये कॉलेज तरुणीवर धारदार शस्त्राने वार! सांगलीतही सामुहिक अत्याचार! देवा भाऊंच्या राज्यात हे चाललय काय?
महाराष्ट्र हादरला! लातुरमध्ये कॉलेज तरुणीवर धारदार शस्त्राने वार! सांगलीतही सामुहिक अत्याचार! देवा भाऊंच्या राज्यात हे चाललय काय?
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा