Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

*टीपू सुलतान यांची जयंती केंद्र व सर्व राज्य सरकारांनी साजरी करावी; ॲड. तोसिफ शेख यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी*

 *पुणे-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे म्हैसूरचे शासक आणि रॉकेट तंत्रज्ञानाच्या लष्करी वापरातील योगदानासाठी ओळखले जाणारे टीपू सुलतान यांची जयंती केंद्र सरकार तसेच देशातील सर्व राज्य सरकारांनी अधिकृतरीत्या साजरी करावी, अशी मागणी जनशक्ती संघाच्या वतीने करण्यात आली आहे.


यासंदर्भात जनशक्ती संघाचे अध्यक्ष ॲड. तोसिफ शेख यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. टीपू सुलतान यांनी ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध संघर्ष करताना देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. तसेच रॉकेट तंत्रज्ञानाच्या लष्करी वापरातील त्यांच्या योगदानाचीही दखल घेतली पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


*भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रतीतील सजावटीच्या चित्रांकनात टीपू सुलतान यांचे चित्र समाविष्ट असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.*


त्यामुळे केंद्र सरकारने टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सर्व राज्य सरकारांना त्यांच्या जयंतीनिमित्त अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक दिशा-निर्देश द्यावेत, अशी मागणी जनशक्ती संघाने केली आहे.

या ऐतिहासिक योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेची ओळख निर्माण व्हावी, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे ॲड. तोसिफ शेख यांनी स्पष्ट केले.


ॲड. तोसिफ शेख 

९८६०९०७३५७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा