Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

आंतरराष्ट्रीय भक्तामर दिनानिमित्त पुण्यात हजारो श्रावक-श्राविकांनी सामुहिकपणे एकसुरात भक्तामर अनुष्ठान करून रचला इतिहास! आचार्य श्री १०८ प्रणामसागरजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रमणोपाध्याय श्री १०८ विभंजनसागरजी गुरुदेव यांच्या पावन सानिध्यात ‘भक्तामर आगाज़-२’ सोहळ्याने प्रस्थापित केले नवीन विक्रम ! भारतीय संसदेत भक्तामर स्तोत्र हवे : आचार्य प्रणाम सागर महाराज.

पुणे, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी, सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर २०२६ पुणे सकल जैन समाजाच्या वतीने धर्म व विद्यानगरी पुण्याच्या पावन भूमीवर आंतरराष्ट्रीय भक्तामर दिनानिमित्त पंडित फार्म, कोथरूड येथे भव्य आध्यात्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. विश्वसंत, ‘भक्तामर वाले बाबा’ डॉ. आचार्य श्री १०८ प्रणामसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला श्रमणोपाध्याय श्री १०८ विभंजनसागरजी गुरुदेव यांचे पावन सान्निध्य लाभले.
या सामूहिक अनुष्ठानात देशातील १३ राज्यातून हजारो जैन श्रावक श्राविकांनी सामुहिकपणे एकाच स्वरात भक्तामर अनुष्ठान केले. भक्ती, श्रद्धा, सामूहिक साधना आणि धार्मिक संस्कारांचा अद्भुत संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला. हा अभिनव सोहळा दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून ९ मिनिटे आणि ९ सेकंदाने संपन्न झाला. संकल्पानुसार हजारो श्रद्धाळूंची एकाग्रता, सामूहिक मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष दिव्यता प्राप्त झाली.
यावेळी आचार्य प्रणाम सागर महाराज म्हणाले, भारतीय संसदेत सर्व धर्माचे धर्मग्रंथ आहेत मात्र तिथे जैन धर्माचा, सर्व पंथाना मान्य असलेला आचार्य मानतुंगाचार्य लिखित भक्तामर स्तोत्र असणे गरजेचे आहे. त्यासाठी सकल जैन समाजाने नियोजनबध्द प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. श्रमणोपाध्याय श्री १०८ विभंजनसागरजी गुरुदेव म्हणाले, भक्तामर स्तोत्रात प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांची भक्ती केली असली तरी विविध व्याधीवर या स्तोत्राचे चांगले परिणाम दिसून येतात. आचार्य मानतुंगाचार्य यांनी धार येथे याची निर्मिती केली. तिथे आचार्य प्रणाम सागर महाराज यांनी प्रथम भक्तामर सामूहिक मंत्र अनुष्ठान घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे हा कार्यक्रम घेतला. त्यांचा भक्तामर प्रचाराचा उपक्रम स्तुत्य व आदर्श असून दोन्ही कार्यक्रमास मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे.
यावेळी भारत सरकारच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या धर्तीवर सहा राज्यात जैन अल्पसंख्याक मंडळ सुरू करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असून जैन अल्पसंख्यक महामंडळाचा लाभ जैन समाजाला देण्यासाठी कटिबद्ध आहे. यावेळी त्यांनी महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती सर्वांना दिली. यानिमित्त पुण्यातील ३० हून जास्त मंदिराचे विश्वस्त, भक्तमर हिलर्स यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी‘भक्तामर आगाज़-२’ अंतर्गत विविध मंदिरांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यातून पाणी वाचवा, पर्यावरण संतुलन तसेच बेटी बचाव असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमांतून भक्ती, धर्मसंस्कार, आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक एकतेचा देखील संदेश देण्यात आला. यावेळी भारत सरकारच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जा प्राप्त ललित गांधी, अरविंद जैन, अचल जैन, राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबोले, ॲड. एस. के. जैन, विलास राठोड, अनिल गेलडा, किशोर शाह सराफ, अतुल काका सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. अहमदाबाद येथील अमरीश मेहता, नागपूर येथील मंजू जैन, चेन्नई येथील सरिता जैन, सोनल जयस्वाल यांच्यासह देशाच्या विविध भागांतून आलेले भक्तामर हीलर्स आणि भक्तामर साधक यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी नागपूर येथील श्रीमती मंजू जैन यांना भक्तामर स्तोत्राचा प्रसार आणि प्रभावनेच्या कार्यासाठी योगदान दिल्याबद्दल ‘भक्तामर प्रभावना पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उज्जैन येथील स्वस्तिश्री स्वामी डॉ. जयेंद्रकीर्तीजी यांना भट्टारक पदवी प्रदान करून गौरविण्यात आले तसेच भक्तामर स्तोत्रावरील चार पुस्तकांचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाकाहार प्रचारक डॉ. कल्याण गंगवाल यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोजागिरी पौर्णिमे निमित्त नाजुश्री सांस्कृतिक भवन निमित्त भक्तामर भक्तकल्याण कार्यक्रम घेण्याचा संकल्प करण्यात आला. प्रास्ताविक मिलिंद फडे यांनी केले. स्वागत आणि सूत्रसंचालन स्वप्निल पाटणी यांनी केले. सोहळा यशस्वितेसाठी मनीष जैन, शीतल लोहाडे, सुजाता शहा, विनय चुडीवाल, सुरेंद्र बडजात्या, डॉ. कल्याण गंगवाल, अभय पाटील, रितेश जैन, वीरकुमार शहा, अभय कोठारी, ममता जैन, प्रीतम मेहता, रवी कासलीवाल, देशभूषण डुड्डू, संतोष नवले, अजित पांढरे, सुकुमाल जैन, वीरेंद्र शहा, किरण शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले. आचार्य श्री १०८ प्रणामसागरजी गुरुदेव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने आणि श्रमणोपाध्याय श्री १०८ विभंजनसागरजी गुरुदेव यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झालेल्या या सोहळ्याने भक्तामर साधनेच्या प्रसाराला नवी दिशा देत धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. यावेळी श्रावक, श्राविकांनी परिधान केलेला भगवा आणि पांढरा वेष सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. आचार्य प्रणामसागर महाराज यांचे दीक्षा गुरु पुष्पदंत सागर तर विभंजनसागर महाराज यांचे दीक्षा गुरु आचार्य स्वर्गीय विरागसागर, विशुद्ध सागर महाराज आहेत. दोघांनी प्रथमचार्य शांतीसागर महाराज यांचा जयघोष करत जैन एकतेचा संदेश दिला. त्याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा