इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
गुरुवार, ८ ऑक्टोबर २६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
______________________________________'f
माजी अर्थ मंत्री जयंत पाटील, 👆सामाजिक कार्यकर्ते उदय ऊर्फ राजू देसाई व मित्र परिवार यांच्या समवेत कार्यक्रमात नटसम्राट नाना पाटेकर.
________________________________________
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते, शेतकरी मित्र नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना गंभीर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सीपीआर देण्यात आला होता. पहाटे सुमारे ५.२० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनामुळे मराठी रंगभूमी, मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड मध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनयातील आक्रमकता, संवादफेकीतील धार, बोलके डोळे, व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होण्याची क्षमता तसेच त्यामुळे पडद्यावर निर्माण होणारी विलक्षण ऊर्जा यामुळे नाना पाटेकर हे भारतीय सिनेसृष्टीतील स्वतंत्र पर्व ठरले. त्यांच्या उत्तम जिवंत अभिनयामुळे त्यांना अभिनय नटसम्राट म्हणून ओळखले जाते.
* रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांच्या अभिनयाची खरी जडणघडण रंगभूमीवर झाली. मराठी नाटकांमधून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या नानांनी पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन' या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात छोट्या-मोठ्या भूमिका करत त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला.
गिद्ध', 'भालू', 'शीला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 'आज की आवाज' या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची दखल घेतली जाऊ लागली. मात्र १९८६ मधील 'अंकुश' हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणाची त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तर
'परिंदा'ने नानांना दर्जेदार अभिनेता म्हणून वेगळी ओळख निर्माण करून दिली.
सन १९८८ मधील 'सलाम बॉम्बे !' आणि त्यानंतर १९८९ मधील 'परिंदा' या चित्रपटांनी नानांच्या अभिनयाला नवी उंची दिली. 'परिंदा'मधील अण्णाच्या भूमिकेने त्यांच्या अभिनयातील ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'प्रहार', 'क्रांतिवीर', 'तिरंगा', 'खामोशी', 'वेलकम' यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी नायक, खलनायक, सहनायक आणि चरित्र भूमिका अशा विविध छटा पडद्यावर जिवंत केल्या. त्यांचा प्रत्येक अभिनय म्हणजे त्या व्यक्तिरेखेचा स्वतंत्र ठसा असायचा.
*'नटसम्राट' म्हणून कायम स्मरणात.
'नटसम्राट' म्हटले की जुन्या पिढीला रंगभूमीवरील डॉ. श्रीराम लागू आठवतात; मात्र रुपेरी पडद्यावर 'नटसम्राट'ला नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे नाव म्हणजे नाना पाटेकर होय.
मराठीतील 'नटसम्राट' या चित्रपटातील गणपतराव बेलवलकर यांच्या भूमिकेत नानांनी उभा केलेला भावनिक संघर्ष, संवाद आणि अभिनय पाहताना प्रेक्षक अक्षरशः अंतर्मुख झाले. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली आणि 'नटसम्राट' ही उपमा त्यांच्या नावाशी कायमची जोडली गेली. त्यांचा ४ ऑक्टोबरचा कार्यक्रम शेवटचा ठरला.
नानांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक उपस्थितीची आठवण अधिकच भावूक करणारी ठरत आहे. ४ ऑक्टोबर रोजी पणजी, गोवा येथे सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या पदग्रहण सोहळ्याला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवातून रसिकांना मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे कार्यक्रमात झालेल्या सांस्कृतिक सादरीकरणात नाना स्वतः सहभागी झाले. डफली वाजवत त्यांनी नृत्यातही सहभाग घेतला आणि उपस्थितांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्या वेळी ते नेहमीप्रमाणे हसत-खेळत, उत्साहाने सर्वांमध्ये मिसळले होते. आज मागे वळून पाहताना तोच क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरला आहे. त्यांच्या त्या शेवटच्या सार्वजनिक उपस्थितीचा व्हिडिओही निधनानंतर समोर आला आहे.
अभिनयाचा 'नाना' आता फक्त आठवणीत...
नाना पाटेकर यांचं जाणं हे केवळ एका अभिनेत्याचं निधन नाही, तर भारतीय अभिनयविश्वातील एका स्वतंत्र आणि प्रभावी अध्यायाचा अंत आहे. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे धारदार संवाद, त्यांची नजर, त्यांचा आवाज आणि पडद्यावरचा त्यांचा करारी वावर कायमच रसिकांच्या स्मरणात राहणार आहे.
रंगभूमीपासून सुरू झालेला हा प्रवास रुपेरी पडद्यावर 'नटसम्राट' बनून अजरामर झाला; मात्र ७५व्या वर्षी नानांनी घेतलेली ही अकस्मात 'एक्झिट' त्यांच्या चाहत्यांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेली.
नाना पाटेकर गेले... पण त्यांचा 'नाना'पणा आणि त्यांचा अभिनयमागे वळून पाहताना तोच क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरला आहे. त्यांच्या त्या शेवटच्या सार्वजनिक उपस्थितीचा व्हिडिओही निधनानंतर समोर आला आहे.
*अभिनयाचा 'नाना' आता फक्त आठवणीत...
नाना पाटेकर यांचं जाणं हे केवळ एका अभिनेत्याचं निधन नाही, तर भारतीय अभिनयविश्वातील एका स्वतंत्र आणि प्रभावी अध्यायाचा अंत आहे. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे धारदार संवाद, त्यांची नजर, त्यांचा आवाज आणि पडद्यावरचा त्यांचा करारी वावर कायमच रसिकांच्या स्मरणात राहणार आहे.
रंगभूमीपासून सुरू झालेला हा प्रवास रुपेरी पडद्यावर 'नटसम्राट' बनून अजरामर झाला; मात्र ७५व्या वर्षी नानांनी घेतलेली ही अकस्मात 'एक्झिट' त्यांच्या चाहत्यांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेली.
नाना केवळ अभिनयात सम्राट नव्हते तर ते बळीराजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणारे प्रसिद्धी पराडमुख, संवेदनशील असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून अनेक शेतकरी कुटुंबांना आत्मनिर्भर केले. वेळप्रसंगी सत्तेतील नेत्यांना सुनवायला देखील त्यांनी कधी कमी केले नाही. मी टु वरून त्यांच्यावर आरोप झाले मात्र त्यांनी सत्यमेव जयते या स्वाभिमानी वृत्तीने जगणे पसंत केले. शंभर वर्ष शेळी सारखे जगण्यापेक्षा नाना कायम शेर म्हणून जगले. चित्रपटात अनेक शेर असताना देखील त्यांनी शेरास सव्वाशेर म्हणत प्रभावी अभिनय करून दाखवत आपल्याला सिद्ध केले.
नाना पाटेकर गेले... पण त्यांचा 'नाना'पणा आणि त्यांचा अभिनय भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात कायम जिवंत राहील. अभिनयाच्या रूपाने ते अमर झाले आहेत. त्यांना टाईम्स 45 न्यूज मराठी परिवाराच्या वतीने भावपूर्ण शब्द सुमनांजली.
यासंदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शोक व्यक्त केला. आदरणीय नाना यांची दमदार, वस्तुनिष्ठ भूमिका चित्रपटास न्याय देत होती. राज्याचा कृषी मंत्री म्हणून आदरणीय नाना यांनी बळीराजा साठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करू, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नाना केवळ एक दमदार अभिनयाचे व्यक्तिमत्व नव्हते तर ते संवेदनशील व्यक्तिमत्व होते. एकदा स्टारडम मिळाल्यानंतर कोणीही पाठीमागे वळून पहात नाही मात्र आदरणीय नाना यांनी आपली शेतीची नाळ आणि बळीराजाचे नाते कधीही तोडले नाही. यामध्ये त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचे संवर्धन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, मराठी रंगभूमी व रंगकर्मी कलाकार ते हिंदी चित्रपट सृष्टी असा नाना पाटेकर यांचा अभिनय प्रवास आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांचे योगदान अनमोल आहे. मी तमाम चित्रपट रसिक, रंगभूमी प्रेमी कलाकार, प्रेक्षक यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
भारतीय चित्रपट सृष्टीतील मराठी नटसम्राट नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये निर्माण झाली पोकळी.
भारतीय चित्रपट सृष्टीतील मराठी नटसम्राट नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये निर्माण झाली पोकळी.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा