Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

*विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत 'छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल, कंदरची यशस्वी कामगिरी*

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
*संस्थापक अध्यक्ष पै. उमेश काका इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलाच्या सर्व मल्लांचे मैदानी कुस्ती मध्ये धडाकेबाज कामगिरी करतच आले आहेत त्याचबरोबर गादी विभागातील सर्व प्रकारांमध्ये आपले मल्ल आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत* ...
. *चालू असलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलाच्या मल्लांची देदीप्यमान कामगिरी करत विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर दणदणीत यश संपादन केले आहे. पै.उमेश काका इंगळे आणि व कुस्ती कोच अण्णा नाईकवडी यांच्या* *मार्गदर्शनाखाली घडलेल्या या मल्लांनी विविध वजन गटांत प्रथम क्रमांक पटकावत कुस्ती संकुलाचे व कंदर गावाचे नाव उज्ज्वल केले* .
*या स्पर्धेत मल्लांनी आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयश मिळवून पुढील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.* *पै. यश सुरवसे (४१ किग्रॅ) - प्रथम क्रमांक* *पै. पृथ्वीराज जाधव (३५ किग्रॅ) - प्रथम क्रमांक* *पै. यशराज जाधव (६२ किलो) प्रथम क्रमांक* *या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडूंचे, त्यांचे वस्ताद आणि पालकांचे आणि कुस्तीप्रेमींचे सर्वस्तरातून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा