*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतन श्रेणी प्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावे, या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने 16 सप्टेंबर 2026 रोजी सह दिवाणी न्यायालय क . स्तर करमाळा व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, करमाळा, जिल्हा सोलापूर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालयासमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले. शासनाच्या वेळ काढून धोरणाचा निषेध करण्यात आला.
राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे जानेवारी 2025 पासून प्रलंबित आहे. न्यायालयीन कर्मचारी महासंघाने शासनास दिलेल्या संपाच्या नोटीसीप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचारी आंदोलनाचा दुसरा टप्पा दिनांक 16, 17 ऑक्टोबर 2026 रोजी काळ्याफिती लावून कामकाज करीत शासनाचा निषेध करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 35 हजार 500 न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
मागणीचे दखल न घेतल्यास दिनांक 05 नोव्हेंबर 2026 रोजी सामूहिक रजा आंदोलन तसेच दिनांक 17 नोव्हेंबर 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे . असे आवाहन श्री सदाशिव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना व श्री महेश पोतदार, तालुका प्रतिनिधी यांनी केले आहे.
सदर आंदोलनामध्ये श्री आर. ए . बिराजदार, अधीक्षक, श्री एन. व्ही साळुंखे, श्री डी ए बगाडे, सहाय्यक अधीक्षक, श्री व्ही. आर. मोरे, करमाळा न्यायालयामधील सर्व न्यायालयीन कर्मचारी व महिला कर्मचारी देखील सामील झाल्या होत्या.
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा येथे समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे करमाळा न्यायालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन संपन्न
करमाळा येथे समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे करमाळा न्यायालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन संपन्न
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा