Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

चिखलठाण येथील सहा शेतकऱ्यांच्या शेती पंपातील तांब्याचा वायरची चोरी वायर चोरीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांमधून होत आहे मागणी Head

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा प्रतिनिधी चिखलठाण तालुका करमाळा येथील सहा शेतकऱ्यांच्या शेती पंपातील तांब्याची वायर चोरीला गेली असून. करमाळा तालुक्यात शेतीपंपातील वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून येथील एक वर्षापूर्वी चोरी झालेल्या त्याच शेतकऱ्यांच्या शेती पंपातील पुन्हा वायर चोरीची घटना घडल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
चिखलठाण येथे गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उजनी जलाशय काठावरील संतोष सरडे ,शिवाजी सरडे ,विठ्ठल सरडे, मारुती सरडे, बन्सी बारकुंड, धनाजी बारकुंड, या शेतकऱ्यांच्या शेती पंपातील वायरची अद्याप चोरट्याने चोरी करून साधारण पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे. काही दिवसांपूर्वी याच गावातील उजनी काठावरील दुसऱ्या ग्रुपच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वयरची चोरी झाली आपत्ती याबरोबरच तालुक्यातील सोगाव, वाशिंबे, रामवाडी,पारेवाडी, दहीगाव ,उमरड या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वायरची चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत _______________________________________ चौकट:- उजनी धरण काठावरील शेतीपंपातील वायर चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून या परिसरामध्ये सराईत चोरांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही टोळी शेती पंप खोलून त्यामधील फक्त तांब्याची वायरच चोरी करत आहे.चोर बाकी साहित्य तसेच टाकून जातात तांब्याच्या वायरचा दर महाग असल्याने एका शेतीपंपातील वायर पासून पाच ते सात हजार रुपये किमतीची वायर मिळते चोरीची शेतीपंपाची विल्हेवाट लावण्याआधी अडचणीचे ठरते याऐवजी स्क्रॅप मध्ये वायर विकणे सहज शक्य असल्याने चोरट्याने हा नवा फंडा शोधला आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण भुर्दंड बसत असल्याने या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गांमध्ये केली जात आहे. ___________________________'___________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा