Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

हिसरे येथे पारधी समाजाच्या वतीने ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांचे उत्साहात स्वागत काळे व पवार परिवाराकडून भाविकांना मोफत नाश्ता, चहा व भोजनाचे वाटप; सेवाभावातून नवरात्रोत्सव साजरा

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी हिसरे येथील पारधी समाजाच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. करमाळा-बार्शी महामार्गावरील हिसरे सिद्धेश्वर नगर येथे विविध गावांमधून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सुमारे 90 ते 100 गावांतील ज्योतींचे स्वागत करून भाविकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आणि ज्योत आणण्यासाठी हजारो भाविक भक्तिभावाने प्रवास करतात. या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना वाटेत अल्पोपहार व भोजनाची सोय व्हावी, या उद्देशाने हिसरे येथील पारधी समाजाने पुढाकार घेतला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरेप्रती असलेली श्रद्धा अधोरेखित झाली.
*** या सेवाभावी उपक्रमांतर्गत काळे व पवार परिवाराच्या वतीने तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत नाश्ता, चहा, साबुदाणा खिचडी, मसाले भात तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. लांबचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. भाविकांची आस्थेने विचारपूस करून त्यांना अल्पोपहार व भोजन देण्यात आले. धार्मिक उत्सव केवळ पूजाअर्चेपुरते मर्यादित न राहता त्यातून समाजसेवा, परस्पर सहकार्य आणि माणुसकीची भावना वृद्धिंगत व्हावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पारधी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या स्वागतामुळे परिसरात भक्ति�

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा