Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत रयतच्या कदम विद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व तालुका क्रीडा संकुल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील खेळाडूंनी विविध खेळ प्रकारात भरघोस यश संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे विद्यालयाला यावर्षी मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल इंदापूर येथे दिनांक ९ व १० ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विविध खेळ प्रकारात अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत यशस्वी झालेले खेळाडू खालील प्रमाणे : १४ वर्षाखालील मुली : १०० मीटर धावणे- ऋतुजा पिटेकर - प्रथम १०० मीटर धावणे : अमृता मोहन फोंडे - द्वितीय. ४ बाय १०० रिले प्रथम : १) विद्या रासकर २) ऋतुज पिटेकर ३) अमृता फोंडे ४) कीर्ती बोराटे ५) श्रावणी बनसोडे उंच उडी : द्वितीय - इंद्रेश्वरी पिंपरे तृतीय - पायल बोराटे ८० मीटर हर्डल्स प्रथम - कीर्ती बोराटे तृतीय - ऋतुजा पिटेकर २०० मीटर धावणे तृतीय- विद्या रासकर. १७ वर्षाखालील मुले व मुली : लांब उडी : प्रथम- भक्ती बोराटे. ४०० मीटर हार्डल्स : प्रथम -भक्ती बोराटे द्वितीय- जफर कोरबू ४०० मीटर धावणे : द्वितीय -भक्ती बोराटे तृतीय - शिवम नामदास. १०० मीटर हर्डल्स : श्रेया परमेश्वर मखरे ट्रिपल जंप : द्वितीय - श्रेया मखरे. उंच उडी : प्रथम - संस्कृती जाधव. द्वितीय - गायत्री शिंदे. ४ बाय १०० रिले : -द्वितीय. १९ वर्षाखालील मुले व मुली : १०० मीटर धावणे प्रथम - साईराज गायकवाड प्रथम - तृप्ती बोराटे. २०० मीटर धावणे : प्रथम - साईराज गायकवाड. क्रॉस कंट्री : साईराज गायकवाड, तृप्ती बोराटे, धनश्री खरात. ४०० मीटर धावणे : प्रथम - तृप्ती बोराटे. हार्डल्स : द्वितीय - तृप्ती बोराटे तृतीय -धनश्री खरात. तिहेरी उडी : तृतीय -पायल हरणावळ. ४ बाय १०० रिले द्वितीय. ४ बाय ४०० रिले -प्रथम सर्व यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य विजय शिंदे, विठ्ठल ननवरे, कैलास कदम, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माजी विद्यार्थी सुनील जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी , पालक व शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते व प्रशिक्षक रणजीत सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा