Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

*पंढरपूर शहरातील गुटखा माफियावर प्रशासन मेहेरबान* *एक आयपीएस, अप्पर अधिक्षक असूनही कारवाईसाठी मुहूर्त सापडेना*. .! *पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष.*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
सध्या पंढरपूर शहरात विशेषतः शाळा महाविद्यालय परिसरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, व विविध प्रतिबंधित वस्तूंची विक्री होत असल्याचे पहावयास मिळत आहे. वास्तविक राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, मावा, इत्यादीची प्रतिबंधित वस्तूंची साठवणूक , विक्री, वाहतूक, करण्यावर बंदी असताना देखील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना गुटखा माफियांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक पाहता पंढरपूर सारख्या शहराला एक अप्पर पोलीस अधीक्षक एक आयपीएस पोलीस अधिकारी व एक अनुभवी पोलीस निरीक्षक लाभलेला असताना यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे व अन्न आणि औषध प्रशासनाने पथक पंढरपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करून गुटखामाफियांना पळवाटा दाखवत असल्याचे पहावयास मिळत आहेत. सहा महिन्यापूर्वीच पंढरपूर शहरातील अनेक गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये संबंधित आस्थापना सील करण्यात आल्या होत्या. त्या आस्थापनांमधून गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच राज्य शासनाने यांनी केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू इत्यादी वस्तूच्या विक्री न करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेला होते.. न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटी ला अधिक राहून आस्थापना उघडण्याची परवानगी दिलेली असताना न्यायालयाचा आदेशाचा अवमान करून अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने त्या आस्थापनेतून खुलेआम गुटखा मावा आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्याची मागणी देखील आता होऊ लागली आहे. वास्तविक पाहता ज्या आस्थापनांवर न्यायालयाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याकरिता प्रतिबंध केला आहे. आस्थापनांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या टीमने फेर तपासणी करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी श्री स्वामी यांना पंढरपूर शहरातील जबाबदारीचा विसर पडला असल्याचे पहावयास मिळत आहे. *पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद...* पंढरपूर शहरात एकीकडे अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र गुटखा माफियांवर मेहरबान असल्याचे पहावयास मिळत आहे. सहा महिन्यापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने काही गुटखा माफियांवर कारवाई करण्यात आली होती. संबंधित आस्थापना सील करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने संबंधित आस्थापनेतून गुटखा तंबाखूजन्य पदार्थ मावा व शासनाने प्रतिबंधित केलेल्या वस्तू विकण्याकरिता प्रतिबंध केल्या होता. या सर्व व शर्थीच्या अधीन राहून सील केलेल्या आस्थापना पुन्हा सुरू करण्यास मेहरबान न्यायालयाने निर्देश दिले होते. मात्र दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आज त्याच आस्थापनेतून उघडपणे गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या कामगिरीविषयी सांशकता व्यक्त केली जात आहे. एकीकडे शहरातील तरुणपिढी गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आहारी जात असताना संबंधित पदार्थाची विक्री व साठवणूक न करण्यासाठी व प्रतिबंधित करण्याकरिता राज्य शासन उपाययोजना करत असताना पोलीस प्रशासन मात्र याच गुटखा माफियांवर मेहरबान असल्यामुळे शहरातील सुजाण नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहराला एक अप्पर पोलीस अधीक्षक तसेच एक आयपीएस अधिकारी लाभलेले आहेत. संबंधित अधिकारी यांच्याकडून अशा गुटखा माफियांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, मावा, इत्यादींची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून कारवाई होणे अपेक्षित असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने ज्या गुटखा माफियांच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती आज त्याच आस्थापनामधून खुलेआम गुटखा, मावा, आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित आस्थापनांना गुटखा मावा आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिलेले असताना देखील न्यायालयाचा आदेश डावलून खुलेआम गुटखा, मावा, आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरूच आहे. या सर्व अवैध धंद्यांना पोलीस प्रशासन, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, यांचाच आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या आस्थापनांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तपास पथकाने कारवाई करावी. तसेच संबंधित अन्न व औषध अधिकारी व अधिकारी कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा