Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६

करमाळा तालुक्यातील विहाळ येथील शिवगिरी शुगर ऍग्रो चा गळीत हंगाम शुभारंभ अर्थात मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा प्रतिनिधी शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड विहाळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या कारखान्याचा गळीत हंगाम 2026-2027 हंगामाचा शुभारंभ मोळी पूजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 9.10. 2026 रोजी कारखान्याचे चेअरमन माननीय अध्यक्ष श्री कालिदास आबा सावंत यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय धनंजय दादा सावंत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव हे होते. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी ऊसगाळप हंगाम 2025 -2026 मध्ये ऊस उत्पादकांना बोलल्याप्रमाणे 3001 रुपये प्रति में. टना प्रमाणे ऊसाची बिल अदा केलेले आहे. चालू ऊस गळीत हंगाम 2026-20 27 मध्ये ही आपल्या बरोबरीचे कारखान्याप्रमाणे उसाला दर देण्यात येणार आहे. तरी ऊस उत्पादकांनी याही वर्षी आपला ऊस शिवगिरी ऍग्रो कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी मा. भरत भाऊ अवताडे पंचायत समिती सदस्य करमाळा व माननीय लटके सर माजी सभापती परांडा, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माननीय किरण तात्या सावंत, परांड्याचे उपनगराध्यक्ष माननीय समरजीत सिंह ठाकुर वं माननीय संजय सावंत ,अजिंक्य भैय्या सावंत,युवराज मामा रोकडे,संचालक मकाई सहकारी साखर कारखाना, रामदास गुंडगिरे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,सचिन तोडकरी सर,सोहमदादा सावंत,, लटके सर,दत्ता बापू मोहिते,अरविंद बप्पा रगडे,गीते सर,बालाजी कातुरे,गणेश खरसाडे, मगनदास पवार,विजय बापू नवले, तोफिक शेख, बालाजी करळे,समाधान पिंगळे,युसूफ सय्यद, सुदर्शन घुले,पांडुरंग काळदाते,शंतनु मेहर विष्णू सांगडे,रोकडे मामा,अशपाक जमादार,आप्पासाहेब चौगुले नाना कदम बालाजी सावंत कल्याण सागर बँकेचे व्हाईस चेअरमन राजेभाऊ चौधरी रामभाऊ मुसळे तसेच करमाळा व परांडा तालुक्यातील ऊस उत्पादक ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे जनरल मॅनेजर देशमुख साहेब शेती अधिकारी रामदास चव्हाण चीफ अकाउंटंट राहुल तांबे सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेंद्र देशमुख साहेब यांनी केले उपस्थितांचे आभार केन मॅनेजर शांताराम जगदाळे यांनी मानले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा