Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६

रुपीनगर येथील डॉक्टर संजय सिताराम गीते यांना आर्यभूषण पुरस्कार.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी रविवार, ११ऑक्टोबर २६ सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
पुणे जिल्ह्यातील निगडी प्राधिकरण उपनगर, रूपी नगर येथील रहिवासी रामायणाचार्य डॉक्टर संजय सिताराम गीते यांना युनिव्हर्सल कौन्सिल अवॉर्डचा आर्यभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते डॉक्टर मनोज बक्षी व प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती नागपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
युनिव्हर्सल कौन्सिल अवॉर्ड हे भारत सरकार मंत्रालय रजिस्टर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत पूर्ण देशभरातून केवळ ५३ लोकांची निवड करण्यात आली. या ५३ लोकांमध्ये महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामधून डॉक्टर ह.भ.प. संजय सिताराम गीते यांना साहित्य, संगीत, योग आणि सामाजिक कार्य या त्यांच्या सातत्यपूर्ण व अतुलनीय पंचेचाळीस वर्षाच्या अनुभवाचा विचार करून त्यांना आर्यभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर ह .भ .प . संजय सिताराम गीते साहित्यिक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. त्याचप्रमाणे योग या विषयावरती त्याची व्याख्याने, योग शिबिर सुरू असतात. योगाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रोगग्रस्त व्यक्तींना तंदुरुस्त केले आहे
तसेच त्यांचा संगीत रामायण हा श्रीरामायण कथा वाचन हा कार्यक्रम हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रभर गावोगावी सादर होत असतो. ते सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील पेन्शनर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष असून महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे ते प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्य करत आहेत. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आर्यभूषण या पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. पुरस्कारानंतर डॉ. संजय गीते यांनी आपले रानफुल हे शेतकऱ्याविषयीची काव्य कथा पुस्तक प्रमुख अतिथींना देण्यात आले. या माध्यमातून प्रथमच दिल्लीमध्ये एक साहित्यिक किंवा अध्यात्मिक कथा वाचक शेतकऱ्याची व्यथा मांडण्यात आली. यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. आर्यभूषण या पुरस्कारामुळे डॉक्टर संजय गीते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा