*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तामलवाडी (ता. तुळजापूर) दि. १३ :-तामलवाडी गावचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढते औद्योगीकरण आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेता गावाच्या स्वच्छता व आरोग्यासाठी घंटागाडीची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून, सध्याची एकच घंटागाडी अपुरी पडत असल्याने नवीन घंटागाडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक श्री. शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*निवेदनात काय म्हटले आहे?*
जावक क्र. ०७/२०२६, दि. १३/१०/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी कडे सध्या ७ ते ८ वर्षांपूर्वी घेतलेली एकच कचरा संकलन वाहन (घंटागाडी) उपलब्ध आहे. सदरील गाडी खूप जुनी झाल्याने तिची कार्यक्षमता कमी झाली असून, ती वारंवार दुरुस्तीसाठी न्यावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आर्थिक ताण वाढला आहे.
गावाचा विस्तार खूप मोठ्या एरियामध्ये झाला असून, एका गाडीने संपूर्ण गावाचा कचरा संकलन करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत असून, दुर्गंधी व रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तरी १५ वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन व जिल्हा परिषद सेस फंडातून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तामलवाडी ग्रामपंचायतीस एक नवीन घंटागाडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत तामलवाडी यांनाही देण्यात आल्या आहेत.
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*तामलवाडी ग्रामपंचायतीसाठी नव्या घंटागाडी ची मागणी; माजी सैनिक सावंत यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
*तामलवाडी ग्रामपंचायतीसाठी नव्या घंटागाडी ची मागणी; माजी सैनिक सावंत यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा