*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
श्री.संत किसन महाराज सुडके राज्यस्तरीय साहित्य गाैरव पुरस्काराने साहित्यिक इंद्रजित पाटील यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या लापनिका या लावणीसंग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश मा.वसंतराव पाटील,सिनेअभिनेते बाळासाहेब शिंदे,ह.भ.प.जनार्दन मुंडे महाराज,संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.कवी इंद्रजित पाटील यांच्या लापनिका या लावणीसंग्रहास मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे.संतनगर संस्थान,कांगाेणी,ता.नेवासा,जि.अहिल्यानगर या ठिकाणी हा बहारदार कार्यक्रम पार पडला.ग्रामीण साहित्यिक इंद्रजित पाटील यांच्या या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक हाेत असून हार्दीक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा