Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

उजनी बाबत नारायण आबा पाटील शेतकऱ्यांची बाजू घेणार, परंतु अर्ध्या तालूक्याचे नेतृत्व करणारे शिंदे बागल गप्प का बसलेत, तळेकर यांचा सवाल*

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
आमदार पदावर असो वा नसो नारायण आबा पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारलेले आहेत. उजनी परिषदेतही आमदार नारायण आबा पाटील यांची भुमिका स्पष्ट पणे दिसुन येईल. परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेची मते घेऊन सत्तेची मलई चाखणाऱ्या शिंदे व बागल गटाच्या उजनी बाबतच्या भुमिका अजुनही गुलदस्त्यातच असल्याचा आरोप आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे. यावर अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकी हक्काचा रहावा यासाठी बोत्रे पाटील यांच्या विरोधात भुमिका घेऊन आमदार नारायण आबा पाटील हे आज न्यायालयीन लढा देत आहेत. अगदी त्याप्रमाणे उजनी वर होणाऱ्या प्रकल्पाबाबत सुध्दा आपण शेतकऱ्यांची बाजू घेणार यावरही आमदार नारायण आबा पाटील ठाम आहेत. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांची मते घेणारे शिंदे व बागल गट हे उजनी बाबत का पुढे येत नाहीत हा सवाल खरं तर धरणग्रस्तांच्या बरोबर प्रसिध्दी माध्यमांनीही त्यांना विचारावा. माजी आमदार संजयमामा शिंदे व जि प सदस्या रश्मी बागल यांनी धरणग्रस्तांच्या समोर येऊन आपली भुमिका मांडावी. कुठे तरी एखाद्या फोन कॉलच्या माध्यमातून भुमिका स्पष्ट होत नसतात. यासाठी धरणग्रस्तांच्या समोर बसुन त्यांच्या व्यथा जाणून घेऊन केलेल्या संवादातून भुमिका जाहीर होत असतात. शिंदे व बागल यांच्यात एवढं धाडस नसणार आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतलेल्या भुमिका या कायमच उजनी विरोधी होत्या हे प्रत्यक्ष कृतीतुन दिसुन येते. यात मग इंदापूर येथील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या मान्यतेचा प्रसंग असो वा त्यांच्या आमदार पदाच्या कार्यकाळात जानेवारी मध्येच मायनस मध्ये जाणारी उजनी असो. संजयमामांच्या काळाणच उजनीचे पाणी दरवाजे उघडून कर्नाटक मध्ये जाऊन पोहचले होते. तर रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी उजनी पट्ट्यातील मकाई व आदिनाथ या दोन्ही कारखान्यावर दीर्घ काळ सत्ता भोगुन दोन्ही कारखाने बंद पाडले. आदिनाथ वर तर बागल यांच्यामुळेच लिलावाची वेळ आली आहे. यामुळे बागल शिंदे यांनी उजनीवरील होऊ पाहणाऱ्या प्रकल्पाच्या बाबतीत आपल्या भुमिका स्पष्ट कराव्यात अन्यथा धरणग्रस्त तुम्हाला पुनर्वसित गावात येण्यापासून आडकाठी सुध्दा घालतील असा सुचक इशारा प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा