Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

*तामलवाडी या.तुळजापूर येथील अत्याधुनिक तीन मजली प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी माजी सैनिक सावंत यांचा पुढाकार*

*तामलवाडी --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे केवळ प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहे व सध्या सर्वात जवळचे PHC सावरगाव हे १० ते १५ किमी अंतरावर आहे त्याठिकाणी सर्व सोईसुविधांची उपलब्धता नसल्यामुळे स्थानिक व अपघातातील गंभीर रुग्णांना सोलापूर किंवा तुळजापूर येथे नेले जाते, ज्यामुळे वेळ वाया जातो परिणामी जादातर जखमी पेशंट दगावतात हे टाळण्यासाठी सध्याच्या तामलवाडी येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या जागेवरच प्रशस्त तीन मजली अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची सकारात्मक मागणी आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर , जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तुळजापूर यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन सादर केले आहे. *निवेदनातील प्रमुख मुद्दे:* *1. जागेची कमतरता:* सध्याचे उप केंद्र अत्यंत लहान असून वाढत्या लोकसंख्येसाठी त्याच जागेवर G+2 म्हणजे तीन मजली भव्य इमारत आवश्यक आहे. *2. २७ गावांचे केंद्रबिंदू:* तामलवाडी येथे पोलीस स्टेशन असल्याने २७ गावांतील नागरिक उपचार व कायदेशीर वैद्यकीय तपासणीसाठी येथे येतात. *3. राष्ट्रीय महामार्ग व औद्योगिक क्षेत्र:* हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर असून लहानमोठ्या एकूण ३०-३२ औद्योगिक कंपन्यांजवळ आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. *4. MLC प्रकरणांसाठी तात्काळ सेवा:* RTA (रस्ते अपघात), मारहाण, विषबाधा, कौटुंबिक हिंसाचार, संशयास्पद मृत्यू या MLC प्रकरणांची तपासणी विना दिरंगाई होण्यासाठी येथे केंद्र गरजेचे आहे. *5. अंतराची अडचण:* सध्या जवळचे PHC सावरगाव येथे असून ते राष्ट्रीय महामार्गपासून १० ते १५ किमी दूर आहे. *6. टोल प्लाझा व अपघातप्रवण क्षेत्र:* येथे मोठा टोल प्लाझा असून रोज लहान-मोठे अपघात होतात. अपघातानंतर पहिल्या जीवनरक्षक तासामध्ये उपचार मिळणे अंत्यंत महत्त्वाचे ठरते. *7. प्रस्तावित इमारत आणि अंदाजपत्रक (Estimate):* सध्या महाराष्ट्रात नवीन PHC साठी शासनाचा दर सुमारे 3.94 ते 4.49 कोटी (पुणे, रायगड टेंडर) आहे. त्यानुसार तामलवाडीतील G+2 (सुमारे 9000 चौ. फूट) इमारतीचा प्रस्ताव आहे: - तळमजला - आपत्कालीन / OPD / MLC कक्ष (3000 sq ft) - रु. 1.50 कोटी - पहिला मजला - प्रयोगशाळा / प्रसूती कक्ष (3000 sq ft) - रु. 1.40 कोटी - दुसरा मजला - कर्मचारी निवास / सौर ऊर्जा व्यवस्था (3000 sq ft) - रु. 1.20 कोटी - आवश्यक वैद्यकीय उपकरणे - X-Ray, ECG, ऑक्सिजन सुविधा, रुग्णवाहिका - रु. 1.00 कोटी *एकूण अंदाजित खर्च: रु. 5.10 ते 5.50 कोटी* *प्रस्तावित इमारतीचे वैशिष्ट्य:* सोबत जोडलेल्या 3D आराखड्याप्रमाणे सौरऊर्जा यंत्रणा, रॅम्प, 24x7 आपत्कालीन सेवा, एक्स-रे, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, औषध साठा, रुग्णवाहिका या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे हे केंद्र असेल. श्री सावंत यांनी माजी सैनिक म्हणून गावाच्या विकासासाठी केलेल्या या सकारात्मक पुढाकाराचे स्थानिक नागरिक, सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. आरोग्य यंत्रणा बळकट झाल्यास ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारेल व रुग्णांना त्वरित उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. २७ गावांतील सुमारे ४५ हजार लोकसंख्येला याचा थेट फायदा होणार असून आरोग्य विभागाकडून लवकरच निधी मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा