*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अल निनोच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन आपण या बैठकीस उपस्थित राहून करमाळा तालुक्यातील उत्तर भागासाठी कुकडीचे आवर्तन मिळावे अशी मागणी बैठकीस उपस्थित राहून करणार तसेच या अगोदरच आपण एका निवेदनाद्वारे हि मागणी केली असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की मंगळवारी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक ही दुपारी तीन वाजता परिषद सभागृहात (मंत्रालय) मुंबईला होत आहे. या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडीच्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्राप्त पत्रानुसार समजले आहे. यामुळे या बैठकीत आपण करमाळा तालुक्यातील उत्तर भागात असलेल्या तीव्र पाणी टंचाई व गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित करणार आहोत. एकुणच करमाळा तालूक्यातही पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणुन कुकडीचे एक विशेष आवर्तन देण्यात यावे व यातुन उत्तर भागातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग आदि पाणीसाठे भरता येतील. तसेच मांगी तलावातही कुकडीच्या आवर्तनातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे करणार आहोत. तसेच करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील गावांना सुध्दा पिण्याचे पाणी, गुरांचा चारापाणी या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनाची मागणी आपण मंत्री महोदयांकडे करणार आहोत. वास्तविक पाहता उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण हा विषय मांडणारच होतो परंतु त्या अगोदरच कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याने आयत्यावेळी हा विषय सुध्दा आपण मांडणार आहौत. तसेच उजनी वर होऊ पाहणाऱ्या चार प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असल्याचे व शेतकरी या प्रकल्पास विरोध करत असल्याने एकंदरीतच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांची बाजू घेऊन त्यांच्या भावना व व्यथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*मंगळवारी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्रीमहोदयांकडे कुकडी व दहिगाव या दोन्ही आवर्तनाची मागणी:--- आमदार नारायण आबा पाटील*
*मंगळवारी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्रीमहोदयांकडे कुकडी व दहिगाव या दोन्ही आवर्तनाची मागणी:--- आमदार नारायण आबा पाटील*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा