इंदापूर, २६ ऑक्टोबर २६ डॉ. संदेश शहा, सहसंपादक
टाईम्स 45 न्यूज मराठी
मो. ९९२२४१९१५९
नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमधील खेळाडू भक्ती सोमनाथ बोराटे हिने ४०० मीटर हर्डल्स खेळ प्रकारात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे तिची विभागीय पातळीवर निवड झाली. तसेच १४ वर्षाखालील ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात मुलींनी द्वितीय क्रमांक मिळवला. साईराज गायकवाड याने १०० मीटर व २०० मीटर मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कीर्ती बोराटे हिने ८० मीटर हर्डल्स मध्ये तर तृप्ती बोराटे हिने १०० मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील मोहिते व पालक रणजीत सातपुते यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य विजय शिंदे, विठ्ठल ननवरे, कैलास कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा