*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील रामवाडी, जिंती, वाशिंबे परिसरात विद्युत मोटारी तील तांब्याच्या तारेची चोरी चे सत्र अध्यापही चालू असून याकडे मात्र पोलीस प्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहे
करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील भीमा नदीकाठच्या एकूण 8 मोटारी 7.5...10......व 12.5 HP चे मोटारीची तोडफोड करून कोपर तार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन रात्रपाळी ची लाईट बंद असताना चोरी करून दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे रामवाडी मध्ये या अगोदर पाच-सहा वेळा अशा घटना घडलेल्या आहेत परंतु एकाही चोरीची अद्याप तपास लागलेला नाही या चोरी बाबत पश्चिम भागातील अनेक शेतकऱ्यांनी पोलिसाकडे तक्रार केली असता याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे उजनी धरणग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांनी पत्रकार अशी माहिती दिली याबाबत गेली दहा ते पंधरा दिवसापासून या भागात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही अट्टल चोर शेतीच्या विद्युत मोटार मधील तांब्याच्या तारेची राजवरोसपणे चोरी करीत आहे सदर घटनेचे गांभीर्याने पाहता वेळीच तपास करून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पश्चिम भागातील विशेषता उजनी धरणग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे
काही दिवसा पूर्वी इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील पोलिसांनी मोठ्या धाडसाने विद्युत मोटार मधील तांब्याची तारा चोरी करणारी मोठी टोळी पकडली होती विशेष करून करमाळा हद्दीत घडलेल्या तपासाचा भिगवन पोलिसांनी वेळीच छडा लावून सदरची टोळी गजाआड केली मात्र सध्या उजनी परिसरातील अजूनही सदर टोळीचे थैमान वाढले असून याकडे करमाळा पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील चोरांचा अद्यापही चोरी सत्राचा सुळसुळाट चालूच पोलीस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील चोरांचा अद्यापही चोरी सत्राचा सुळसुळाट चालूच पोलीस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा