Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

दुष्काळाच्या फटक्यात किरकोळ व्यापारी देखील संकटात; कर्जवसुलीला स्थगिती द्या.ॲड.राहुल मखरे यांची राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या कडे आग्रही मागणी.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्याचा थेट परिणाम ऐन दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ व्यापारी, स्टॉलधारक, हातगाडीवाले आणि हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. ग्राहकांची संख्या आणि बाजारातील उलाढाल घटल्याने महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर बँका, फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांकडून घेतलेल्या ५० हजार, १ लाख, २ लाख रुपये अशा छोट्या कर्जांची सक्तीची वसुली थांबवावी, कर्जदारांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कर्जावरील व्याज स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार मा. शरदचंद्र पवार साहेब यांनी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी बारामती येथील गोविंदबाग येथे प्रत्यक्ष साहेबांची भेट घेत कार्यकर्ता प्रशिक्षण विभागाचे राज्यप्रमुख ॲड. राहुल मखरे यांनी केली. दुष्काळाचे दूरगामी परिणाम लक्षात घेता आपल्या मागणी संदर्भात अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब सकारात्मक असल्याचे ॲड. राहुल मखरे यांनी सांगितले. ॲड. राहुल मखरे पुढे म्हणाले, उजनी ( ता. माढा ) येथे प्रस्तावित नवीन डेटा सेंटरमुळे शेतकरी, पर्यावरण तसेच मच्छीमार व्यावसायिकांवर संभाव्य परिणाम होणार आहेत का? असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार असल्याचे साहेबांनी सांगितल्याने या विषयावर त्यावेळी सविस्तर चर्चा झाली नाही. उजनी धरण क्षेत्रालगत असलेल्या शेतकरी व रहिवाशांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असून, त्यांचा प्रश्न योग्य पद्धतीने मांडल्यास साहेब न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास ॲड. राहुल मखरे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा