Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

*विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काळादिन साजरा करून जिल्हाधिकारी यांना निवेदन.*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
गेल्या दोन-तीन दिवसापासून दिल्ली येथील जंतर- मंतर येथे सुरू असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनामा द्यावा यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आंदोलन करित असताना अमानुषपणे लाटीचार्ज करून, धक्काबुक्की करून सर्व खासदारांना ओढत पोलीस गाडीत बसवून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंका गांधी, खासदार प्रणितीताई शिंदे व इतर तीनशे आघाडीचे खासदार यांना अमानुषपणे वागणूक देऊन अटक करण्यात आली. यांच्या निषेधार्थ माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी जे काही कथित घोटाळे केले आहेत. त्याची संपूर्ण माहिती देशातील जनतेला कळाली आहे. जनता जागृत झालेली आहे. आता त्यांच्या राजीनाम्या शिवाय पर्याय नाही. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत हा आमचा लढा चालूच राहील. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आपल्या मार्गदर्शन म्हणाले. की लोकसभेचा विरोधी पक्षनेता हे पद पंतप्रधानपदाच्या बरोबरीचे पद असून अशा पदाच्या व्यक्तीला अमानुषपणे वागणूक देणे. धक्काबुकी करून फरपटत नेणे. अशा गोष्टी निंदनीय आहेत. म्हणून आज भाजप सरकारचा आम्ही निषेध करून आज काळा दिवस पाळत आहोत. अशा गोष्टी पुन्हा घडल्यास महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार (दक्षिण सोलापूर), सुलेमान तांबोळी (मोहोळ), भारत जाधव (उत्तर सोलापूर), प्रशांत साळे( मंगळवेढा,) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता घोडके (दक्षिण सोलापूर), तुषार साठे (उत्तर सोलापूर),जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, प्रा. सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, संघटक सिद्राम नाना पवार, मोतीराम चव्हाण, महादेव जाधव, बिरा खरात, दाजी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, मौलाली शेख,दत्तात्रय पवार, तुकाराम भडकुंबे, युवराज कापसे, रजाक कादरी,नूरअहमद नालवार, विठ्ठल शेळके, प्रशांत पटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा