*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची केंद्रीय दुष्काळी पथकाने चक्क निराशा केली असून सदरचे केंद्रीय दुष्काळी पथक अहिल्यानगर मार्ग वरील जातेगाव येथून आले तर सरळ ते विश्रामगृहात पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी महसूल तसेच कृषी अधिकाऱ्या समवेत 15 मिनिटात दुष्काळी बैठक संपवून बार्शीकडे सदरचे पथक रवाना झाले
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात दाखल झाले. जातेगाव येथून हे पथक करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात आले. तेथे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे थांबून तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पथक बार्शीच्या दिशेने सोलापूरकडे रवाना झाले.
केंद्रीय पथकाने शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यानंतर दुपारी तीन वाजता पथकाचे करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे आगमन झाले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेती, पाणी आणि अन्न विभागातील तज्ज्ञ पथकात,,,,,,,,
केंद्रीय पथकामध्ये कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी, पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अकसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश होता. तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे हेही पथकासोबत उपस्थित होते.
विशेष म्हणजे, गुरुवारीच करमाळा तालुक्यातील करंजे येथील एका शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थिती आणि पिकांना पाणी मिळत नसल्याच्या कारणामुळे आत्महत्या केली होती. या घटनेमुळे तालुक्यातील संकट अधोरेखित झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत केंद्रीय पथक करमाळ्यात येऊनही प्रत्यक्ष पाहणी केली नाही.
केंद्रीय दुष्काळी पथकाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला असून यामुळे मात्र करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्गांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
केंद्रीय दुष्काळी पथकाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची केली निराशा पथक पिके पहावयास आले तसे गेले करमाळ्यात विश्रामगृहात बसून १५ मिनिटांमध्ये घेतला आढावा

Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा